पुणे ग्रामीण,दि.०८:- तक्रारदार हे शेतकरी असून तक्रारदाराच्या आजोबांनी तक्रारदारांना बक्षीसपत्राने ३९ गुंठे जमीन बक्षीसपत्राची नोंद सातबारा उतार्यावर नोंद करण्यासाठी ५ हजार रूपयाची लाच घेताना पुरंदर तालुक्यातील सजा सोनोरीमधील तलाठी आणि एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहेत.तलाठी निलेश सुभाष गद्रे (४२, पद – तलाठी, सजा – सोनोरी ता. पुरंदर, जि. पुणे) आणि आदित्य मधुकर कुंभारकर (२१, रा. वजपुरी, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी की, तक्रारदार बक्षीसपत्राने 39 गुंठे जमीन बक्षीसपत्राची नोंद सातबारा उतार्यावर करण्यासाठी त्यांनी रितसर अर्ज केला होता. तलाठी निलेश गद्रे यांनी त्यांच्याकडे ५ हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली.
दरम्यान, तक्रारदाराने अॅन्टी करप्शनकडे तक्रार केली.
आरोपी आदित्य कुंभारकर यांनी तक्रारदार यांच्याकडून ५ हजार रूपयाची लाच तलाठी गद्रे यांच्यासाठी घेतली. अॅन्टी करप्शनच्या पथकाने दोघांना देखील ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची आला आहे.
ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर तपास करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास १) हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४, – २) अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे दुरध्वनी क्रमांक ०२० २६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३ – ३) व्हॉट्स अॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३ ४)
५) व्हॉट्स अॅप क्रमांक मुंबई – ९९३०९९७७००
क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांनी केले आहे.