पुणे,दि.०८:- बाणेर, बालेवाडी, सूस आणि म्हाळुंगे या परिसरातील .
मधील प्रत्येक नागरिकाची दिवाळी गोड व्हावी; यासाठी बाबुराव चांदेरे यांच्या माध्यमातून दिवाळी फराळ उपलब्ध करून दिला असून, या उपक्रमास
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, बाणेर, बालेवाडी, सूस व म्हाळुंगे यांच्या वतीने आयोजित दिवाळी सरंजाम वितरण सोहळ्यात आमदार लंके कार्यक्रमावेळी बोलले की. महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात दिवाळी सरंजाम वाटप कोणीही केली नसेल, असे वाटप बाबुराव चांदेरे यांनी केले, प्रत्येकाला मदत करीताना त्यांनी परिसरात विकासाची गंगा सर्वांकरिता आणली. यावेळी शहराध्यक्ष दीपक मानकर यांनीही मनोगत व्यक्त केले विशेष म्हणजे त्यांच्या पसायदानाने सर्व नागरिक व व्यासपीठ मंत्रमुग्ध झाले.
राहुल बालवडकर, नितीन कळमकर, सागर बालवडकर, समीर चांदेरे, किरण चांदेरे व पुनम विशाल विधाते तसेच या परिसरातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उत्कृष्टपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी युवक शहराध्यक्ष समीर चांदेरे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साखरे, हभप पंकज महाराज गावडे, ग्राहक पेठेचे संचालक सूर्यकांत पाठक, सुनील चांदेरे, सुहास भोते, संगीता कोकाटे, प्रमोद निम्हण, नितीन चांदेरे, मनोज बालवडकर, निलेश पाडाळे, सरला चांदेरे, तेजल दुधाने, राखी श्रीराव, सुषमा ताम्हाणे, वैशाली तापकीर, प्राजक्त दळवी व इतर मान्यवरांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.