पुणे,दि.१८ :- एटीएम कार्ड ची अदलाबदल करत एका व्यक्तीची ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १६ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ६ ते साडेसहाच्या दरम्यान बालाजी चौक, पाषाण, सुस रोड येथील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये घडली.एक जेष्ठ नागरीक, वय ७३ वर्षे रा. पाषाण सुस रोड, पुणे यांनी या प्रकरणी १६ नोव्हेंबर रोजी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी ईसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी १६ नोव्हेंबर रोजी पैसे काढण्यासाठी यसीआयसीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये गेले होते. एटीएम मध्ये गेले असताना, नमुद इसम यांने फिर्यादी यांची नजर चुकवुन हातचलाखीने त्यांचे हातातील डेबीट कार्ड काढुन घेवुनअ नोळखी व्यक्तीने मशीन मधील कार्ड स्वतःजवळ ठेवून दुसरे कार्ड फिर्यादी यांना देत कार्डची अदलाबदल केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या बँक खात्यावरून ५० हजार रुपये काढून घेत फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पो.उप. निरी. सोनवणे करत आहे