पुणे दि. २७ : – पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता चतु:श्रृंगी वाहतूक विभागांतर्गत टाटा मेट्रो लाईन ३ च्या कामाअंतर्गत माऊली पेट्रोल पंप ते महाबळेश्वर चौक येथील पीलर क्र. पीएमआर १६-सी ते ई दरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांतर्गत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
यानुसार पल्लोग फार्म ते विधाते चौकाकडे जाणारे मार्ग तसेच ताम्हाणे चौक ते कपिल मल्हार चौक बाणेर रोडदरम्यान 28 ऑक्टोबर 2024 च्या सायं. 6 वाजेपर्यंत प्रवेश बंदी (नो- एन्ट्री) करण्यात आली आहे, असे पुणे शहर वाहतूक शाखेचे उप आयुक्त अमोल झेंडे यांनी कळविले आहे.