पुणे,दि.१८:- पुणे शहरातील एम.जी रस्त्यावरील एका दुकानात एम. डी. म्हणजेच मेफेड्रॉन विकणार्या दोघांना पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून १५ लाख ७० हजारांचा ७७ ग्रॅम एम.डी. पावडर जप्त करण्यात आली आहे.
https://www.instagram.com/reel/DE9supQNMGc/?igsh=MTRlazkzbDlnMW0waQ==
हुसेन नुर खान (२१, रा. कोंढवा), फैजान अयाज शेख (२२, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील फैजान याचे एम.जी रस्त्यावरील कोळसा गल्ली येथे की-मेकर्सचे दुकान आहे. पुणे शहर परिसरात छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी होते. दोन दिवसांपूर्वीच येरवड्यात पोलिसांनी २३ लाखांचे एम. डी. पकडले. तस्करांचा शोध घेवून त्यांना अटक करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथक हद्दीत गस्तीवर होते.
या दरम्यान एम.जी रस्त्यावरील कोळसा गल्लीतील एका दुकानात दोघेजण थांबले असून त्यांच्याकडे एम.डी. पावडर असल्याची माहिती अंमलदार विशाल दळवी यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून खान आणि शेख यांना ताब्यात घेतले. तपासात त्यांच्याकडे १५ लाख ७० हजारांचे ७७ ग्रॅम एम.डी पावडर मिळून आली.
सदरची कारवाई ही पुणे शहर पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे १, गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहा पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार संदेश काकडे, विशाल दळवी, विनायक साळवे, प्रविण उत्तेकर, दत्ताराम जाधव, विपुल गायकवाड, रेहाना शेख, योगेश मोहीते यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.