पुणे,दि.२४:- राजा बहादुर मिल परिसरातील हॉटेल बच्चुस डिनर क्लब उर्फ बाकस या पब चा डिस्कोथेकचा परवाना संपला असताना त्यांनी त्याचे नुतनीकरण न करता तिथे साऊंड सिस्टिमवर म्युझिक वाजवून नियमभंग करणाऱ्या राजा बहादुर मिल परिसरातील हॉटेल बच्चुस डिनर क्लब (बाकस) यांच्या मालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कपील फुलसे, अनुज विनोदकुमार अगरवाल, जतीन राजपाल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा बहादुर मिल येथील हॉटेल बच्चुस डिनर क्लब उर्फ बाकस या पबमध्ये डिस्कोथेक आहे. या डिस्कोथेकचा परवाना संपला असताना त्यांनी त्याचे नुतनीकरण न करता तो डिस्कोथेक चालू ठेवला होता. बंडबार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी १९ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता तेथे गेले होते. त्यांनी डिस्कोथेकचा परवाना तपासला, तेव्हा त्याची मुदत संपून गेली होती. असे असतानाही साऊंड सिस्टीमवर संगीत वाजवून शासकीय नियमांचा भंग केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार अधिक तपास करीत आहेत.