पुणे दि, २२ :- शिवाजीनगर प्राईड हॉटेल व एलआयसी मधील रस्त्यावरील हॉकर्स झोन मधील प्रमाणपत्र धारक हॉकर्स व्यवसायिकांची आज ( शुक्रवार ) रोजी तपासणी करण्यात
आलेली व्यवसाय अटी-शर्थीचा भंग करणाऱ्या १६ हॉकर्स चे स्टॉल पुणे महापालिकेचे अतिक्रमण विभाग यांनी सील करण्यात आलेले आहेत. तसेच अनाधिकृत ९ हॉकर्सवर साहित्य जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. सदर कारवाई मा उप आयुक्त अतिक्रमण यांचे उपस्थितीत करण्यात आलेली आहे