पुणे दि ०७ :- (प्रतिनिधी)वृक्ष जीवनाचा अविभाज्य भाग असल्याने वृक्ष लागवड उपक्रम महत्वाचा महत्वाचा असून या माध्यमातून अधिकची झाडे लावणे, लावलेली झाडे जगवणे आणि त्यांची वाढ करणे अत्यंत महत्वाचे आहे, असे प्रतिपादन खासदार गिरीश बापट यांनी केले.
भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त टिळक रस्ता परिसरात महापौर मुक्ता टिळक यांच्या संकल्पनेतून १०० वृक्ष खासदार गिरीश बापट आणि पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या हस्ते लागवड करण्यात आले. त्यावेळी बापट बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापौर मुक्ता टिळक, कसबा विधानसभा भाजप अध्यक्ष नगरसेवक राजेश येनपुरे, गोरे मॅडम,डिसीपी परिमंडळ १, वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष आदित्य माळवे, गणेश सोणूने, कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे आशिष महादळकर उपस्थित होते. यावेळी नगसेवक अजय खेडेकर, धीरज घाटे, महेश लडकत, सम्राट थोरात, नगरसेविका गायत्री खडके, सरस्वती शेंडगे,रघु गौडा यांच्यासह,विद्यार्थी आणि नागरिक तसेच भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमात ज्ञान प्रबोधिनी, डी.ई.एस. स्कुल, माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय, नू.म.वि. मुलींची प्रशाला,
एस.पी.एम. इंग्लिश स्कुल, महाराष्ट्रीयन मंडळ आणि न्यू इंग्लिश स्कुलचे विद्यार्थी सहभागी झाले होते.बापट पुढे म्हणाले म्हणाले, पर्यावरणाचा ऱ्हास होत गेल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मनुष्याचे आयुर्मानही त्यामुळे कमी होत आहे. मानवी जीवणाकरिता आणि पर्यावरण संतुलासाठी जास्तीत जास्त झाडे लावणे गरजेचे आहे. या उपक्रमाचे महापौर टिळक यांनी यशस्वी नियोजन केले आहे.महापौर टिळक प्रास्ताविकात म्हणाल्या, ‘लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने शहरात मोठ्या प्रमाणावर नियोजन केले जाणार असून केवळ अर्धा तासात टिळक रस्त्यावर १०० झाडे लावण्यात आली, ही आनंदाची बाब आहे. या परिसरातील शाळा, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा संवाद वाढवा आणि मैत्री आणि समनव्यय राखून वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संतुलन राखण्यास मदत व्हावी, या उद्देशाने हा अभिनव उपक्रम राबविला गेला’.
गोळवलकर शाळेचे प्रसाद लागू यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर हर्षल रोटे यांनी आभार मानले.