पुणे दि १५ : – पुणे ग्रामीण घोडेगाव येथील तहसील कार्यालयाच्या आवारात प्रांतधिकारी संजय पाटील यांनी कार्यवाही करून डबर वाहतुक करणारी ट्रक आणून ठेवली होते व तडजोड . एक लाख रुपयांच्या लाच प्रकरणी घोडेगावच्या तहसीलदारालाअॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या
कारवाईमुळे महसूल विभाग अॅन्टी करप्शनच्यारडारवर असून आजच्या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.
श्रीमती सुषमा पांडुरंग पैकेकरी, वय ४१, तहसीलदार आंबेगाव रा तहसीलदार निवास, घोडेगाव,जिल्हा पुणे असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या तहसीलदाराचे नाव आहे.घोडेगाव येथील तहसील कार्यालयाच्या आवारात प्रांतधिकारी संजय पाटील यांनी कार्यवाही करून डबर वाहतुक करणारी ट्रक आणून ठेवली होती.तहसिलदार सुषमा पैकेकरी यांनी डबर वाहतुक करणा-या ट्रकवर २ लाख ४१ हजार ५० रूपये दंड
आकारणार असल्याचे तक्रारदार यांना सांगितले.तक्रारदार व तहसिलदार सुषमा पैकेकरी यांच्यात झालेल्या तडजोडीनुसार ४६ हजार रूपये दंड व १ लाख रूपये लाच देण्याचे ठरले. यावरून तक्रारदार यांनी पुणे येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज दि.१५ रोजी सायंकाळी ६
वाजता तहसील कार्यालयामध्ये ५० हजार रूपयांचीरोख लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.सापळा पथक दिलीप बोरस्ते, अपर पोलीस अधीक्षक, दत्तात्रय भापकर, पोलिस उपअधीक्षक,श्रीमती सीमा मेहंदळे, पोलीस उप अधीक्षक
पो.हवा खान, पो ना टिळेकर, पो शि राऊतलाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी का कारवाई केली आहे