चिंचोली दि ०१ लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी जि प प्रा. शा.चिंचोली तपसे येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी लातूर जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरिक रावजीबाबा यादव, जयप्रकाश सेलूकर, लक्ष्मण कांबळे, प्रशांत नेटके व अश्फाक शेख हे उपस्थित होते.
प्रथम लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्या नंतर मान्यवरांचे स्वागत शाळेच्या वतीने एक छोटी पुस्तिका भेट देऊन करण्यात आले. यावेळी विध्यार्थ्यानी इंग्रजी व मराठीमधून भाषणं केली
जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील यांनी सखोल असं मार्गदर्शन केले,अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकला तसेच त्यांनी विध्यार्थ्याच्या सर्वांगीन विकासावर भर द्यावा तसेच नेत्यांच्या जिवन चरित्राच सामूहिक वाचन घेण्यात यावं असे विचार व्यक्त केले, तसेच लक्ष्मण कांबळे यांनी पण आपले विचार व्यक्त केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोहार संतोषीमाता यांनी केले तर आभार धर्मराज भिसे यांनी मानले
यावेळी शाळेचे मु अ मोहनराव मोरे अशोक पवार, प्रदीप इज्जपवार, विलास चव्हाण व अनुराधा कनामे या उपस्थित होते.
प्रशांत दिलीप नेटके प्रतिनिधी :- तपसे चिंचोली