निरा नरसिंहपूर: दि.०१ :-शहाजीनगर (ता.इंदापूर) येथिल निरा भिमा सहकारी साखर कारखानाच्या जनावरांच्या छावणीस गुरूवारी (दि.1)राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंञी महादेव जानकर यांनी भेट दिली. आगामी काळात चारा उपलब्ध होईपर्यंत छावण्या सुरू राहणार राहतील,अशी ग्वाही याभेटीप्रसंगी पशुसंवर्धन मंञी महादेव जानकर यांनी दिली.
निरा भिमा कारखाना कार्यस्थळावरील छावणीत सध्या 1700 जनावरे आहेत.कारखान्याचे वतीने शहाजीनगर तसेच शिरसटवाडी व खोरोची येथे चारा छावण्या सुरू आहेत,अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी मंञी महोदयांना दिली.या भेटीत महादेव जानकर यांनी छावणीतील शेतक-यांशी संवाद साधला.
या छावणी भेटीनंतर मंञी महादेव जानकर यांचा कारखान्यावरती अध्यक्ष लालासाहेब पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी बोलताना महादेव जानकर यांनी सांगितले की,मध्यंतरी शेतक-यांना 15 किलो चारा दिला जात होता परंतु तो अपुरा पडत असल्याने 18 किलो चारा देण्याचा निर्णय आंम्ही घेतला आहे. भूमिहीन शेतक-यांची जनावरे छावणीत दाखल करून घेणेसाठी पशुसंवर्धन अधिका-याचा दाखला ग्राह्य धरण्याचा शासकीय आदेश लवकरच काढण्यात येईल.निरा भिमा कारखान्याची कारखान्याचे संस्थापक व माजी मंञी हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची उत्कृष्टपणे प्रगती सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तात्कालिक संसदिय कार्यमंञी हर्षवर्धन पाटील, शिवाजीराव देशमुख व पतंगराव कदम यांनी मी आमदारकीची शपथ घेतलेनंतर विधिमंडळ कामकाजाबाबत मार्गदर्शन केल्याची आठवण याप्रसंगी बोलताना मंञी महादेव जानकर यांनी नमूद केली.मंगळवारी मुंबईत दिमाखात पार पडलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा विधानगाथा पुस्तक सोहळ्यास सर्व पक्षांची नेते मंडळी फक्त हर्षवर्धन पाटील यांच्यामुळेच एकञ आली होती,असे गौरवोद्गारही यावेळी बोलताना मंञी जानकर यांनी काढले.
याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, मंगेश पाटील,विलासराव वाघमोडे,धनंजय कोरटकर,दादासाहेब घोगरे,संजय बोडके,दिलिपराव ढोले,सुरेश मेहेर,श्रीमंत ढोले, दादासाहेब केसकर,किरण गोफणे,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बाळासाहेब सुतार निरा प्रतिनिधी