बोरघर / माणगांव दि,०७ :- माणगांव तालुक्यातील इंदापूर तळाशेत येथील समर्थनगर येथील ४१ कुटुंबे आणि साईनगर येथील ५ कुटुंबे यांच्या घरात पावसाचे पाणी घुसले.आहे व इंदापूर नदीचे पाणी इंदापूर बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात शिरले आणि संपूर्ण इंदापूर येथील मुंबई-गोवा रस्त्यावर आले होते. याबाबतची माहिती माणगांवच्या उपविभागीय तथा दंडाधिकारी प्रशाली जाधव / दिघावकर मॅडम आणि माणगांव तहसीलदार प्रियंका अहिरे मॅडम यांना समजताच त्यांनी महसूल कर्मचारी यांना सोबत घेऊन घटनास्थळी दाखल होवून
त्यांनी ताबडतोब समर्थनगर व साईनगर येथील ४६ कुटुंबांना घरातून बाहेर काढून त्यांना तात्काळ तळाशेत येथील रा.जि. प. शाळेत सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले असून या कुटुंबामध्ये १७६ लोक आहेत. त्यांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली आहे.
सदर पिडीत राहिवाश्यांच्या घरात पाणी शिरल्यामुळे कपडे, धान्य व जीवनावश्यक वस्तू भिजले आहेत. त्यामुळे या राहिवाश्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई लवकरच मिळण्यासाठी इंदापूर तलाठी हे या रहिवाश्यांच्या घरातील नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार आहेत. व राहिवाश्यांच्या मदतीसाठी दक्षिण रायगड जिल्हा शिवसेना प्रमुख अनिल नवगणे, तळाशेत सरपंच दिनेश महाजन व ग्रामस्थ तत्परतेने धावून आले आणि पिडीतांना मदत केली.