पुणे दि १४ :- एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी काम करणाऱ्या पंढरपूर येथील पालवी संस्थेने आकर्षक रंगीबिरंगी राख्या पुणेकरांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.
एचआयव्हीग्रस्त
मुले आणि महिलांनी या राख्या तयार केल्या आहेत. सामाजिक संस्था, कार्यकर्ते तसेच नागरीकांनीही या राख्या विकत घेऊन संस्थेच्या मुलांना आर्थिक पाठबळ द्यावे, असे आवाहन राखी विक्री केंद्राच्या प्रमुख मंगला शहा यांनी केले.
पन्नासहून अधिक राख्यांची मागणी आल्यास त्या कुरिअरने वा संस्थेच्या प्रतिनिधी मार्फत पाठविण्यात येतील. राख्यांबाबत अधिक माहितीसाठी 88888 58562 किंवा 77438 94993 येथे संपर्क साधावा. सुखसागर नगर येथील संस्थेच्या कार्यालयातही या राख्या पाहता येतील.