लामजना दि.०६ :-औसा तालुक्यातील लामजना जिल्हा परिषद प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने १६ शिक्षकांना मानचिन्ह देऊन आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले.या वेळी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेला जि.प.सदस्य महेश पाटील, पं.स.सदस्या मंगल कांबळे, सरपंच जाहेदाबी पटेल व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले.
याप्रसंगी शालेय व्य.स.अध्यक्ष विजय दंडगोले म्हणाले शालेय व्यवस्थापनच्या स्वखर्चाने या समितीने १६ शिक्षकांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले व पहिला उपक्रम लामजना प्रशालेत राबविण्यात आला तरी दुस-या शाळेनेही लामजना शालेय समितीचे आदर्श घ्यावे असे ते सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय दंडगोले तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य महेश पाटील, प्रशालेचे मुख्याध्यापक आर जी.पाटू , पं.स.सदस्या मंगल कांबळे, सरपंच जाहेदाबी पटेल, उपसरपंच वाजीद बिरादार, शा.व्य.स.उपाध्यक्ष हुमेरा शेख,शेतकरी मारुती साखर कारखान्याचे संचालक अमित दिनकर माने, माजी सैनिक बालाजी शेळके, शालेय व्य.स.सदस्य संजय शिंदे, वर्षाराणी शेळके, सरिता स्वामी,रविंद्र शेळके, बालाजी कांबळे, मन्मथ स्वामी, लक्ष्मीकांत महामुनी, केदार बिराजदार, वैजिनाथ डिगुळे, शिक्षकवृंद, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुञसंचालन गणेश बिराजदार यांनी केले तर आभार संजय शिंदे यांनी मानले.
लातूर प्रतिनिधी:- प्रशांत नेटके