पुणे, ७ :- पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी गोपनीय माहिती मिळाली की कात्रज येथे लॉटरी, नावाखाली जुगार घेतला जात आहे तेथे ऑनलाइन लॉटरीच्या नावाखाली बुकिंग घेताना आढळे व सर्व सह निशा करून पोलिसांनी त्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ५ सप्टेंबर रोजी पोलीस शिपाई शशांक खाडे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती दाराकडून पोलीस उपनिरीक्षक खडके यांच्या मार्गदर्शनाखाली कात्रज येथील, किनारा हॉटेलजवळ चालू असलेल्या परमार लॉटरी व जय गणेश लॉटरी येथे छापा टाकून २४,३९०/- रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम व मोबाईलसह इतर जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यात जुगार घेणारे व खेळणारे अशा एकूण १३ जणांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ११ आरोपींना अटक करण्यात आली असून २ जण फरार आहेत.
सदर कारवाई गुन्हेचे पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, उपनिरीक्षक खडके, यांच्यासह सामागिक सुरक्षा विभागाकडील पोलीस हवालदार करपे, पोलीस नाईक पठाण, शिपाई कोळगे, खाडे, भांडवलकर, पठाण यांनी केली आहे.