इंदापूर दि ०७ :- पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील सालाबाद प्रमाणे गणपती व गौरी महालक्ष्मी यांचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रंगरंगोटी लाईट माळा खेळण्याच्या अनेक प्रकारच्या मुर्त्या व गोड पदार्थ पुरणपोळी मिठाई लक्ष्मीच्या समोर ठेवून पूजा करण्यात येते व महिलां त्यांच्या
सहकार्याने देवीसाठी एकमेकींना हळदी कुंकवाचा मान देऊन हा सण मोठ्या उत्साहाने व गुन्हा गोविंदाने आनंदाने साजरा करण्यात येतो लक्ष्मी च्या समोर सडा रांगोळी दीपमाळा लावून महालक्ष्मी देवीची व गणरायाची आरती ही आनंदाने महिला व नागरिक लहान बालक करीत असतात या सणाचा सर्वच ग्रामस्थ महिला मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन सण साजरा करण्यात येतो
प्रतिनिधी इंदापूर तालुका बाळासाहेब सुतार