पुणे, दि. २८: – पुणे चाकण पोलिस स्टेशन अंकित म्हाळुंगे पौलिस चौकी येथील पोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन लाख रूपयांची लाच स्विकारताना अँटी करप्शन जाळ्यात सापडले आहे
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्याविरूद्ध चाकण पोलिस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. व गुन्ह्यामध्ये न्यायालयात ‘क’ फायनल पाठवण्यासाठी पोलिस निरीक्षक अनिल उर्फ भानुदास जाधव यांनी १० लाख रूपयांची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. होती व तक्रारीची २७ सप्टेंबर २०१९ रोजी पडताळणी केली असता जाधव यांनी तडजोडीअंती ७ लाख रूपये लाच म्हणून मागितले व पहिला हप्ता २८ सप्टेंबर २०१९ रोजी ३ लाखाचा घेऊन येण्यास सांगितले. व सापळा रचला असता अनिल जाधव यांनी लाचेची रक्कम भापकर यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानंतर भापकर यांनी स्कॉर्पिओ गाडीवरील चालकास बोलावून रक्कम खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे येथे ३ लाख रूपये स्कॉर्पिओ गाडीत ठेवण्यास सांगून त्यांनी स्विकारले. यानंतर स्कॉर्पिओ चालकास अधिकार्यांनी त्यांची ओळख सांगण्याचा प्रयत्न केला असता चालकाने सदर गाडी चालू करून रक्कम पळवण्याचा प्रयत्न केला असता पथकातील पोलिस अधिकारी पोलिस उपअधिक्षक लाप्रवि श्रीहरी पाटील, याना गाडीचा धक्का मारून पुढे घेऊन गेले. यात त्याना दुखापत झाली आहे. अनिल जाधव यांना ताब्यात घेण्यात आले असून भापकर व चालकाचा शोध सुरू आहे. या घटनेबाबत चाकण पोलिस स्टेशन, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व कारवाई पोलिस उपायुक्त/पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधिक्षक दिलीप बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.