पुणे दि,१२ :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकप्रिय युवानेते व अधिकृत उमेदवार मा. सुहास भगवानराव निम्हण यांच्या प्रचारार्थ काल शुक्रवार दि.११ रोजी सायंकाळी ९ वा. हेल्थ कॅम्प-पांडवनगर-गुंजाळवाडी-हनुमान नगर-महालेनगर या भागात पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. मतदारांच्या गाठी भेटींवर भर देण्यात आले. तसेच अनेक मंडळ-प्रतिष्ठान व मंदिरांनाही भेट दिली. त्यांना समाज मंदिरे बांधण्यात येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी शिवाजीनगर मधील पदाधिकारी, मनसैनिक, कार्यकर्ते, तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पदयात्रेत शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावून हजारो मताधिक्क्याने निवडून देण्याचा विश्वास हेल्थ कॅम्प-पांडवनगर-गुंजाळवाडी-हनुमान नगर-महालेनगर या भागातील जनतेने आम्हास दिला. या वेळी बोलताना सुहास निम्हण म्हणाले कि, येथील नागरिकांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. नागरी सुविधा पुरविण्यास आमचे प्राधान्य असणार आहे. तसेच भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी मतदारांना यावेळी केले….