• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, July 12, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

कलाप्रेमींसाठी पुणे आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन – शारीरिक आव्हानांवर मात केलेल्या कलाकारांसाठी विशेष विभाग

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
25/12/2019
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे-दि २५ : -सांस्कृतिक शहर म्हणून ख्याती असलेल्या पुणे शहरात रंगसमर्थ आर्ट स्टुडिओच्या वतीने जगभरातील नवख्या आणि उत्साही कलाकारांसाठी पुणे आर्ट फेस्टिव्हलचे आयोजक गणेश केंजळे यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन गुरुवार ते रविवार (ता.२६ ते २९) दरम्यान कोथरुड येथील पंडित फार्म्स येथे दररोज सकाळी १० वाजेपासून खुले राहणार आहे. प्रदर्शनात चित्रकला, शिल्पकला, क्राफ्ट, छायाचित्रकला अशा विविध कलांची निवड करून हौशी, व्यावसायिक, आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले आणि विद्यार्थी कलाकार त्यांच्या कलेचे सादरीकरण करणार आहे.

फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी (ता.२६) सकाळी दहा वाजता फेस्टिव्हलचे उद्घाटन आणि कलाकारांचा परिचय होणार असून या दरम्यान प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ हे एनडिज फिल्म वर्ल्डचे प्रमुख नितीन देसाई यांची मुलाखत घेणार आहे. त्यांनतर दुपारी तीन वाजता कलाकारांची भाषणे आणि संवाद होणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता सरोद, पखवाज, तबला जुगलबंदी, वासुदेव कामत यांचे चित्रकला, प्रशांत गायकवाड यांची शिल्पकला आणि गिरीश चरवड यांचे कला सादरीकरण होणार आहे. पहिल्या दिवसाची सांगता ही आंतरराष्ट्रीय बॉलीवुड घराना अभिजित पोहोंकर यांच्या कलेने होणार आहे. फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी (ता.२७) अकरा वाजता अकबर मोमीन यांच्या थ्री डी रांगोळीचे लाईव्ह डेमो प्रदर्शन होणार असून दुपारी तीन वाजता चित्रकार स्पीड आणि मिरर पेंटिंग कलाकार साहिल लाहरी यांचे लाईव्ह डेमो दाखवण्यात येणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता कल्लाकर फॅक्टरीचा फॅशन शो होणार असून साहिल लाहरी, मुस्कान, प्रणव, बी स्ट्रीट क्रू यांच्या संघातर्फे कला सादरीकरण होणार आहे. या दिवसाचा शेवट गायत्री सपरे ढवळे आणि कुमार करंदीकर यांच्या आवाजात सुफी आणि गझल गायन होणार आहे. फेस्टिवलचे शेवटचे दोन दिवस राहुल ठाकरे या आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या कलाकाराचे अविरत लाईव्ह सादरीकरण चालू राहील.फेस्टिवलच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी (ता. २८) अकरा वाजता प्रीती यादव यांचा पेंटिंग आर्ट डेमो होणार असून स्वप्ना माळवदे यांच्या ऑईल पेंटिंग कलेचे सादरीकरण होणार आहे. दुपारी तीन वाजता विख्यात कलाकारांचे आर्ट डेमो आणि कार्यशाळा होणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता बिग बॉस फेम पराग कान्हेरे यांचा डोळ्यावर पट्टी बांधून पंचपक्वान्न थाळी तयार करून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा मानस आहे. साडेसात वाजता बॉलीवुड धमाका करण्यासाठी प्रेम कोतवाल आणि टीमतर्फे दिवसाचा शेवट होणार आहे. फेस्टिवलच्या शेवटच्या दिवशी (ता. २९) सकाळी दहा वाजता प्रसिद्ध कलाकारांचे आर्ट डेमो आणि कार्यशाळा होणार असून सायंकाळी साडेपाच वाजता राजू कुलकर्णी यांचे इन्स्ट्रुमेंटल सादरीकरण होणार आहे. तसेच, नाविन्य कायम ठेवण्यासाठी डान्सिंग पेंटर विष्णु मर्देकर यांचे सादरीकरण होणार आहे. फेस्टिवलचा रंगतदार समारोप करण्यासाठी साडेसात वाजता वैशाली सामंत आणि टीमच्या वतीने सांगीतिक मेजवानी सादर होणार आहे.जगभरातील कला एकाच व्यासपीठावर साजरी करण्यासाठी या प्रदर्शनात देशातील सर्व कला श्रेणीतील प्रवेशांचे स्वागत असेल पण त्याचबरोबर, किमान ४० टक्के कलाकार हे इतर देशांतील असतील. प्रदर्शनाच्या माध्यमातून ‘मर्यादेपलीकडची कला, बंधने आणि शैली’ यांना विशेष स्थान देऊन स्वत:ला कलाकार म्हणून पाहणाऱ्या आणि इतरांच्या कलेचा आदर करणाऱ्या सर्वांना एका व्यासपीठावर आणण्याचा या फेस्टिव्हलचा उद्देश आहे. तसेच, पीएएफ कला प्रदर्शनात कलेचे सौंदर्य वाढविण्यासाठी शारीरिक आव्हानांवर मात केलेल्या कलाकारांसाठी एक विशेष विभाग ठेवण्यात आला आहे.पीएएफमध्ये विवेकी प्रेक्षकांसाठी मेजवानी म्हणून उदयोन्मुख आणि स्वतंत्र कलाकारांच्या कलाकृती सादरीकरणासाठी कमीत कमी २०० गॅलरीज असून सदर प्रदर्शनास जगभरातील कला विक्रेते (आर्ट डीलर्स), कला ग्राहक (आर्ट बायर्स), कला तज्ञ, इंटिरियर डिझाइनर्स, वास्तुविद्याविशारद आणि आर्ट रसिक भेट देणार आहे. या दरम्यान चर्चासत्र (पॅनल डिस्कशन), कलेचा लाईव्ह डेमो आणि हे प्रदर्शनाचे विशेष आकर्षण असणार आहे.
कलेची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी हा फेस्टीव्हल एक संधी ठरणार आहे. या ठिकाणी रसिकांना ‘आर्ट मेला’च्या अंतर्गत हजाराहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांना भेटण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी प्रेक्षकांना ५ हजाराहून अधिक कला प्रकार अनुभवायला मिळणार आहेत. याशिवाय, हा फेस्टीव्हल कलाकार आणि रसिकांकरिता अधिक मनोरंजक बनवण्यासाठी फॅन फेस्ट, फूड फेस्टिवल, फॅशन शो, एन्टरटेन्मेंट झोन, प्ले एरिया, सुफी नाईट, कॉकटेल पार्टी, वाईन फेस्टीव्हल, रोबोटिक्स आणि लाईव्ह कॉन्सर्टचेही आयोजन करण्यात आले आहे.

Previous Post

भरदिवसा सराफी व्यापा-याची बॅग हिसकावून लाखोची रोकड व सोने लंपास

Next Post

मराठी पत्रकार परिषदेच्या प्रसिध्दी प्रमुखपदी अनिल महाजन यांची नियुक्ती

Next Post

मराठी पत्रकार परिषदेच्या प्रसिध्दी प्रमुखपदी अनिल महाजन यांची नियुक्ती

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist