टेंभुर्णी दि ०९ प्रतिनिधी :- टेंभुर्णी येथील करमाळा चौकामध्ये मिळालेल्या टेंभुर्णी पोलिसांना गोपनीय माहितीवरून सापळा रचून मोटर सायकल चोरून घेऊन जात असताना टेंभुर्णी येथील करमाळा चौकामध्ये त्याला अडवून विचारपूस केली असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केल्या व त्याच्याकडे कसून चौकशी केली असता चोरीची असल्याचे निष्पन्न झााले व त्याला टेम्भूर्णी पोलिसांनी अटक करून आज माढा न्यायालयासमोर उभे केले असता एक दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे
टेंभुर्णी पोलिसाकडून सविस्तर मिळालेली माहिती अशी की टेंभुर्णी पोलीस पेट्रोलिंगकरत असताना त्यांना खबर्या मार्फत एक मोटर सायकल चोर मोटर सायकल चोरीची घेऊन अकलूज च्या दिशेने चालला असल्याची माहिती मिळाली होती त्याच्या अंगावर राखाडी रंगाची मळकट जीन्स परिधान केलेली असून डाव्या डोळ्या वर चिकटपट्टी लावण्याची खबर्याने दिलेल्या माहितीवरून दि.०८ रोजी संध्याकाळी ६.३० वा . टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलिसस्टेशनचे ए.पी.आय राजेंद्र मगदुम पो.काॕ प्रसाद काटे पो .विजयकुमार डोंगरे व पो.ह. शिवाजी भोसले यांनी साफळा रचुन करमाळा चौकामध्ये खबर्याने दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी आला असता त्याला शिताफीने पकडण्यास टेंभुर्णी पोलिसांना यश आले असून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता तो सुरज विष्णू बदपटटे वय 24 रा. किल्लानगर आकलुज ता.माळशिरस येथिल आसुन त्याला पोलिसस्टेशनला आणले असता ती मोटरसायकल चोरीची असल्याचे सांगितले दरम्यान पोलीस ठाणे अभिलेख पडताळा असता पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 12 / 19 कलम 379 भादवी मधील दि, 07/01/2020 ला चोरीस गेलेली मोटरसायकल असल्याचे नमूद झाले त्यावरून फिर्यादी कैलास मिस्कीन रा. चव्हाणवाडी (टें ) ता. माढा जि. सोलापूर असल्याचे दिसून आल्याने मोटारसायकल मालकास भ्रमणध्वनीवरून त्याला बोलावून घेऊन होंडा स्प्लेंडर प्लस कंपनीची रजिस्टर क्रमांक MH 42/Ak 80 56 ही मोटर सायकल माझीच असलेली त्यांनी कबूल केले त्यावरून मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करून आज माढा न्यायालयासमोर उभे केले असता माढा ज्ञायालयाने एक दिवस पोलीस कोठडी देण्यात आली असुन पुढील तपास पो.ह.शिवाजी भोसले करीत आहेत.
प्रतिनिधी मु.पो.टेंभुर्णी ता.माढा जि सोलापुर :- अनिल भागवत जगताप