पुणे दि १९ : – तक्रारदार यांचा नारळ विक्रीचा व्यवसाय असून नारळ विक्री करीत असलेल्या ठिकाणी विक्रेत्याकडून ५०० ची लाच घेणाऱ्या त्या मुकादमाला रंगेहाथ पकडून त्यांच्या घरी एसीबीने टाकलेल्या छाप्यात घबाड सापडले असून, यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. सुनील रामप्रकाश शर्मा (वय ५५) असे घरात घबाड सापडलेल्या मुकादमाचे नाव आहे.
शनिवारी मुकादमाने येरवडा भागातील एका नारळ विक्रेत्याकडे १ हजार रुपयांची लाच मागितली होती. या करवाईत एसीबीने पालिकेचा मुकादम शर्मा आणि खासगी व्यक्ती गोपी उबाळे (३२) यांना पकडण्यात आले होते. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुनील शर्मा हे येरवडा क्षेत्रीय कार्यालयात मुकादम म्हणून नोकरीस आहेत.तर उबाळे हा खासगी व्यक्ती असून तो बिगारी कामे करतो. नारळाच्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी लाच घेतली होती. यानंतर एसीबीने शर्मा याच्या लोहगाव येथील घरावर छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात पैसे आणि सोन्याचे दागिने मिळाले. व
या ठिकाणी ३६ लाख रुपयांची रोकड आणि ७ तोळ्यांचे दागिने मिळाले आहेत. दागिने आणि रोकड जप्तकरून ते येरवडा पोलीस ठाण्यात पहाटे जमा करण्यात आले आहेत. दरम्यान रोकड आणि दागिने मिळाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. व एसीबीने कारवाई करून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार शर्मा आणि उबाळे यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनतर छापा टाकून सापडली ३६ लाखांची रोकड आणि ७ तोळे सोने पंचा समक्ष येरवडा पोलीस ठाण्यात जमा केली आहे. सदर कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, व अप्पर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे