मुंबई २३ :- हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त युवा सेना आणि भा.वि. सेना यांच्या संयुक्त विद्यमाने “भव्य मराठी पुस्तक प्रदर्शनाचे” आयोजन शिवसेना शाखा क्रमांक १२६ साईनाथ नगर रोड गणेश मैदान गणेश नगर घाटकोपर (प) येथे करण्यात आले आहे . या पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन युवा सेनेचे अमोल कीर्तिकर (सरचिटणीस युवा सेना) राजेंद्र राऊत (विभागप्रमुख ईशान्य मुंबई विभाग क्रमांक ८) डॉ.भारतीताई बावदाणे (ईशान्य मुंबई महिला विभाग संघटिकाविभाग क्रमांक ८), मंदार चव्हाण ( युवा सेना सहसचिव) त्यावेळी नगरसेवक सुरेश पाटील, मा.नगरसेवक दिपक (बाबा )हांडे ,तसेच सर्व पुरुष महिला उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, महिला आघाडी, ग्रा.सं.क, भा.वि. सेना, युवासेना व शिवसैनिक उपस्थित होते. हे प्रदर्शन ११ जानेवारी २०२० ते २३ जानेवारी २०२० ,दरम्यान सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.१००/- रुपयापासून ते ६००/- रुपया पर्यतचे पुस्तक हे निव्वळ ७०/- रुपयात पुस्तकप्रेमींना खरेदी करता येणार आहेत या भव्य मराठी पुस्तक प्रदर्शनात ऊद्द्वजी ठाकरे यांची अप्रतिम फोटोग्राफी मिलिंद गुणाजी यांची ओघवती लेखनशैली महाराष्ट्रातील गड किल्ल्याचे वैभव दाखवणारे छायचित्राचे संपूर्ण रंगीत व सुबक संग्रह पुस्तके देखील उपलब्ध आहेत.तसेच कथा, कादंबरी, काविता, ललित, नाटक याबरोबरच चरित्र, आत्मचरित्र, माहितीपर, ऐतिहासिक, पर्यावरणीय, धार्मिक, राजकीय विषयांवरी पुस्तकांचा समावेश आहे. याशिवाय बालसाहित्य, पाककला, आरोग्य, मानसशास्त्र, विविध व्यवसाय मार्गदर्शन व स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तकेही आहेत. माझा लढा-अडॉल्फ हिटलर, माझी जन्मठेप, युगप्रवर्तक, स्वामी विवेकानंद , टिपू सुलतान , माझी जन्मठेप , माझा प्रवास , आजीबाईचा बटवा तसेच राजकीय, सामाजिक , कला , आरोग्य , क्रीडा व्यक्तींचा प्रवास उलगडणारी पुस्तके या प्रदर्शनामध्ये उपलब्ध करण्यात आली आहेत. विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. हे भव्य मराठी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन अभिषेक मोरे (विभाग अधिकारी ), कु. ललिता मुरकुटे (युवती विभाग अधिकारी), चैतन्य राऊत (विभाग संघटक भा.वि. सेना) विशेष सहकार्य शिवसेना शाखा क्रमांक १२६
मुंबई जिल्हा प्रतिनिधी :- बाळू राऊत