पुणे दि ०४ :- सेव्ह नेशन या संस्थेच्या वतीने 9 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय रन फॉर मेरीट चे आयोजन केलेले आहे . एकाच वेळी राज्यातील प्रमुख तीस शहरांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार असून यामध्ये तरुण – तरुणी विदयार्थी महिला व्यापारी असे खुल्या प्रवर्गातील विविध घटका सहभागी होणार आहेत . मतांच्या राजकारणासाठी अत्याधिक आरक्षणाच्या धोरणाचा अवलंब केला जात आहे . पण यामळे खुल्या प्रवर्गातील गुणवत्ताधारक तरुणांना डावलले जात आहे . याविरोधात सेव्ह मेरिट सेव्ह नेशन सक्रिय असून रस्त्यावरच्या लढाईपासून न्यायालयीन लढाई पर्यंत सर्व प्रकारच्या संवैधानिक आयुधांचा वापर करत आहे . या लढाईचाच एक भाग म्हणून खुल्या प्रवर्गातील न्याय मिळवून देण्यासाठी रन फॉर मेरीट चे आयोजन करण्यात आले असल्याचे संस्थेचे राज्य उपाध्यक्ष श्री विश्वजीत देशपांडे यांनी सांगितले . दि . 9 फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी सात वाजता जंगली महाराज रस्त्यावरील पाषाणकर ऑटो चौकातून रन फॉर मेरिट ची सुरुवात होईल व डेक्कन जवळ कर्वे रोड येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाजवळ समारोप होईल . रन फॉर मेरीट साठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टी – शर्ट दिले जाणार असन अधिकार विदयार्थी महिला तरुण – तरुणी सर्व समाज घटकांनी रन फॉर मेरीट मध्ये सहभागी व्हाते से आवाहन जिल्हाध्यक्ष श्री विवेकानंद पाठक , डॉ सुश्रुत शहा , डॉ अर्चना चिंचवडकर , डॉरेणका श्री संजय गांधी , श्री आनंद दवे , श्री प्रशात कौसडीकर , श्री जयंत गौरकर , श्री मदन सिन्नरकर अर्चना अग्रवाल , श्री महेंद्र लुनिया , श्री धीरज ओस्तवाल , श्री अमित कवी आदींनी केलेले आहे