टेंभुर्णी दि ०५ :- ( प्रतिनिधी ):-टेंभुर्णी ता.माढा शुक्रवार पेठ येथील दत्त मंदिराजवळील पिठाच्या गिरणीत दळण ठेवण्यासाठी गेलेल्या तरुणीला अंगाशी झोंबाझोंबी करून हाथ पकडून” तू मला लय आवडतेस” असे आरोपी रोहित उर्फ नन्या रूपचंद कांबळे रा. टेंभुर्णी यांनी छेड काढली मुलीच्या आईने जाब विचारायला गेले असता तिला डोक्याचे केस धरुन ढकलून दिले व हानमार केली व “तू कशी तक्रार करतेस ते आम्ही बघून घेतो तू आमच्या विरोधात केस दिली तर तुम्हाला टेंभुर्णीत राहू देणार नाही” असे मुलीच्या आईला व आजोबांना दमदाटी करून हानमार केली आहे आरोपी रोहीत ऊर्फ नन्या रूपचंद कांबळे( वय. २१)वर्षे व त्याचा साथीदार मारूती भारत कांबळे (वय. २२) वर्षे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.काॅ. शिवाजीराव भोसले हे करीत आहेत.
प्रतिनिधी मु.पो.टेंभुर्णी ता.माढा जि सोलापुर :- अनिल जगताप