इंदापूर, दि १८ :- इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीत मटका जुगार अड्ड्यावर पुणे ग्रामीण पोलिसांचा जुगार अड्डावर छाप्या १० जणांना अटक व ४९ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त इंदापूर येथे मटका जुगार अड्डा सुरु असल्याची गोपनीय माहिती माहिती पोलिसांना मिळाली होती इंदापूर शहरामध्ये अवैध मटका जुगार चालू आहे अशी माहिती माननीय जयंत मीना सो. (आय पी एस ) अप्पर पोलीस अधीक्षक बारामती यांना बातमीदार मार्फत मिळाली असता त्यांनी बारामती क्राईम ब्रँच चे प्रमुख चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक यांना सांगून त्यांना सदर ठिकाणी रेड करणे बाबत सांगितले असता त्यांनी त्या अनुषंगाने इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीतयेथे जाऊन माहिती घेऊन बारामती क्राईम ब्रांच चे पोलीस जवान आणि इंदापूर पोलीस स्टेशन चे अधिकारी आणि जवान यांच्यासह अचानक ठीक ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी 8 इसम हे कल्याण मटका नावाचा मटका जुगार चालवत होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन खालील वर्णनाचे साहित्य जप्त केले-1)39,620/- एकूण रोख रक्कम
2)10,000/- एक विवो कंपनीचा मोबाइल 49,620 /- एकूण मुद्देमाल आरोपी 1) सोमनाथ सोपान शिंदे 2) पप्पू लक्ष्मण राऊत हे दोन दोघे मालक असून आठ मटका घेणारे रायटर 1) रहीम मोहम्मद शेख राहणार वेंकटेश्वर नगर इंदापूर 2) सुरेश तुकाराम हाके राहणार पडस्थळ तालुका इंदापूर 3 ) नंदकुमार कल्याण ढावरे राहणार गणेश नगर इंदापूर 4) ब्रह्मदेव कल्याण ढावरे राहणार गणेश नगर इंदापूर 5) गोकुळ तुळशीराम परदेशी राहणार खडकपूर इंदापूर 6 )दादाराम सिताराम राऊत राहणार अंबिका नगर इंदापूर 7 )शैलेश बाळासाहेब दहिदुले राहणार गणेश नगर इंदापूर 8 ) नजीर मुनीर सय्यद वेंकटेश नगर इंदापूर यांचेसह एकूण 10 आरोपींविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कामगिरी माननीय संदीप पाटील सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण.
मा. जयंत मीना सो, (आयपीएस) अप्पर पोलीस, अधीक्षक बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोनि मधुकर पवार, इंदापूर पो स्टे, पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, तसेच आरसीपी पथकातील 9 पुरुष 3 महिला जवान पोलिस जवान यांनी तसेच- इंदापूर पो स्टे पोसई देटे चे पोलीस जवान बापू मोहिते, राम जगताप आदींनी कारवाई केली