पुणे दि २९ :- इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स , कोलकाता यांचे तर्फे दि . २८ / ०२ / २०२० रोजी द ओबेरॉय ग्रेड हॉटेल , कोलकाता येथे Icc ( इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ) यांचे मार्फत Empowering the Rural Population या शिर्षकाखाली विविध संस्था कडून सामाजिक सबलीकरणाकरीता राबविण्यात येणा – या उपक्रमांकरीता पारितोषिक जाहिर करण्यात आले आहे . सदर पारितोषिकाकरीता पुणे पोलीसांच्या वतीने श्रीमती शिल्पा चव्हाण पोलीस निरीक्षक व मपोशि ७९४८ भगत यांनी द ओबेरॉय ग्रॅड हॉटेल , कोलकता येथे समक्ष सादरीकरण केले यामध्ये भारतातून ७० संस्थानी सहभाग घेतला होता . त्याकरीता मा . श्री . बच्चन सिंह , पोलीस उप आयुक्त , गन्हे पुणे शहर यांनी केलेली सादरीकरणाची माहिती व पीपीटीद्वारे समक्ष
सादरीकरणाचे आधारावर प्रथम पारितोषिक मिळाले आहे . नागरीकांना उत्कृष्ट सेवा देणेकरीता सेवा भावनेतुनच मा . पोलीस आयुक्त डॉ . के . व्यंकटेशम यांनी “ श्रेष्ठ सेवा पिडीत मदत ” बोधवाक्य नजरेसमोर ठेवून दि १ सप्टेंबर २०१८ रोजी S . E . V . A . ( Service Excellence and victim Assistance ) या प्रकल्पाची स्थापना झाली असून आज रोजी पर्यत २ , ३७ , १२८ नागरीकांनी भेटी दिल्या असून मा . पोलीस उप आयुक्त ते पोलीस शिपाई यांनी २ , ०३ , ८१९ तक्रारीबाबात नागरीकांशी संपर्क साधला आहे . तसेच इनस्टावाणी या सामाजिक संस्थेने सेवा कार्यप्रणालीचे मुल्यांकन केलेले आहे . सेवा कार्यप्रणालीचे दैनंदिन कामकाज मा . श्री . बच्चन सिंह पोलीस उप आयुक्त , गुन्हे शाखा यांचे देखरेखीखाली चालते सेवा कार्यप्रणाली येथे प्रमुख म्हणून पोनि शिल्पा चव्हाण व १० पोलीस कर्मचारी कार्यरत असून पोलीस स्टेशन व पोलीस स्टेशन स्तरावरील पोलीस चौकीस नेमलेले प्रत्येकी १ पोलीस कर्मचारी असे १३२ कामकाज पाहतात . सेवा कार्यप्रणालीसं मा . गृहमंत्री , महाराष्ट्र राज्य , श्री अनिल देशमुख , व मा . गृह राज्यमंत्री शहर श्री . सतेज पाटील , मा . लोकसभा सदस्य , खासदार श्रीमती सुप्रिया सुळे , यांनी भेटी दिलेल्या आहेत . तसेच सेवा कार्यप्रणाली ही संपूर्ण राज्यात प्रसारीत व्हावी / राबवावी हि भावना व्यक्त केली आहे . सदर पारितोषिकांस ४० संस्थाचे प्रतिनिधींनी त्यांचे संस्थेचे सामाजिक सबलीकरणावर सादरीकरण केले . सादर केलेल्या सादरीकरणाचे परितोषिकाकरीता अंतिम निवड ही उपस्थित प्रेक्षक यांनी दिलेल्या मतांवरुन करण्यात येणार होती . पुणे पोलीस यांचे तर्फे सेवा कार्यप्रणाली बाबत मा पोलीस उप आयुक्त गुन्हे , श्री बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती शिल्पा चव्हाण , पोलीस निरीक्षक यांनी सादरीकरण केले . सादर करण्यात आलेल्या ४० सादरीकरणातून Empowering the Rural Population या शिर्षकाखाली मिडीयम प्रोजेक्ट म्हणून विजेता घोषित करण्यात आले . सदर कार्यक्रमाचे पारितोषिक मा . श्री शशी पांजा , महिला व बालविकास मंत्री , पश्चिम बंगाल , श्रीमती राखी सरकार , आय सी सी ॲवॉर्ड चेअरपर्सन यांचे हस्ते प्रदान करण्यात आले आहे . सेवा कार्यप्रणाली वर दर दिवशी मा श्री . के . व्यंकटेशम , पोलीस आयुक्त , पुणे शहर , मा श्री . रविंद्र शिसवे , सह पोलीस आयुक्त , पुणे शहर , मा . श्री . अशोक मोराळे , अपर पोलीस आयुक्त गुन्हे , पुणे शहर , मा . श्री . बच्चन सिंह , पोलीस उप आयुक्त , गुन्हे , पुणे शहर यांचे देखरखी खाली सदर कार्यप्रणालीचे कामकाज चालू आहे .