पुणे दि ०८ :-भारती अभिमत विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप (‘आयएमईडी’) मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्ववान महिलांशी संवाद आणि ‘महिलांची आर्थिक प्रगती‘ विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली.’केसरी टूर्स ‘च्या मुख्य कार्यकारी अधिकारी झेलम चौबळ, परिमंडळ ३ च्या पोलीस उपअधीक्षक पौर्णिमा गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी,सामाजिक कार्यकर्त्या स्वाती डिंबळे,लेखिका विजयालक्ष्मी रेवणकर यांच्याशी व्यवस्थापनशास्त्र विषयाचे विद्यार्थी आणि प्राध्यापक संवाद साधला. ‘आयएमईडी’ च्या पौड रस्ता येथील कॅम्पस मध्ये हा कार्यक्रम ७ मार्च रोजी सकाळी १० वाजता झाला.श्रेया वेर्णेकर यांनी ‘आर्थिक व्यवस्थापन’ विषयावर मार्गदर्शन केले.कर्तुत्ववान महिलांचा सत्कारही या कार्यक्रमात करण्यात आला. तसेच ’याराथॉन ‘बँड ने गाणी सादर केली’इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ‘आयएमईडी’ चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी स्वागत केले. संयोजन समितीचे सदस्य डॉ. भारती जाधव,डॉ.स्वाती देसाई, डॉ.सीमा तारणेकर, डॉ.रजिता दीक्षित, प्रतिमा गुंड हे उपस्थित होते.