आष्टी दि . ८ :- ( प्रतिनिधी ) जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बीड येथे झुंजार नारी मंच सचिव सौ आशाताई अजित वरपे यांच्या मार्गदर्शना खाली व झुंजार नारी मंच , आष्टी यांच्या वतीने यशवंत नर्सिंग कॉलेज येथे खास महिलांसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते व आष्टी येथील स्त्री रोग तज्ञ डॉ . वर्षा शिवाजी राऊत , डॉ . रिजवाना नदीम शेख , डॉ . कल्पना विशाल वारूगुळे , डॉ . ज्योती प्रदीप अकोलकर व डॉ . राजश्री प्रकाश झाजे यांनी महिलांना गर्भाशयाचे आजार , मासिक पाळी समस्या , मानसिक आजारावर होमिओपॅथी उपचार , स्तन कॅसर , स्त्री यांच्या शारीरिक व मानसिक सददृढतेसाठी आहार , विहार , योग्य व्यायाम व योग – ध्यानधारणा इत्यादी विषयी अत्यंत माहितीपूर्ण व विस्तृत असे योग्य मार्गदर्शन केले व आरोग्य मार्गदर्शन शिबीर नंतर कन्या प्रशाला येथील शिक्षक राजेंद्र लाड सर व सौ उर्मिला आत्माराम कुँदे मॅडम यांनी खास महिलादिनानिमित काही कविता व चारोळ्या सादर करून महिलांचे मनोरंजन ही केले त्यानंतर अल्पोपहार करून राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली व कार्यक्रमाचे बहारदार प्रास्ताविक शारदा धस यांनी केले तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक आभारप्रदर्शन झुंजार नारी मंच आष्टी तालुका अध्यक्ष सौ मनीषा महेश चौरे यांनी केले , हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सौ मनीषा तावरे , जयश्री उगले , सौ रागिणी गणेश पिसाळ , सौ वर्षा राऊत , सौ मनीषा चौरे व झुंजार नारी मंच आष्टी च्या सर्वच महिलांनी सहकार्य केले व मोठया प्रमाणात उपस्थिती ही लावली होती