महीला दिन विषेश
पाथरी दि ०८ :-रोजच वर्तमानपत्र,दुरचित्रवानी वर पहात असतांना देशभर कुठेना कुठे महीला अत्याचाराच्या घडना घडल्याच्या बातम्या पहावयास मिळतात.पुरुषी मानसीकते तुन निघत महीलांचा सन्मान व्हावा ही मानसीकता शालेय जिवनात सर्वत्र सांगुन शिकवली जात असतांनाही समाजा मध्ये स्रीयांकडे पहाण्याची मानसीकता काही बदलत नाही. अशा विचित्र मानसीकतेला आता स्रियांनीच सक्षम पणे सामोरं गेलं पाहिजे या साठी पाथरीत संगिता ढगे या शालेय,महाविद्यालयीन मुलिंना स्वसंरक्षणाचे धडे ज्यूदोकराटे च्या माध्यमातून प्रशिक्षण देत आहेत.
पाथरी शहरातील सागर कॉलनीतील रहीवाशी असलेल्या संगिता ढगे यांनी करातेत ब्लॅक बेल्ट पर्यंत प्रशिक्षण घेतले आहे.या प्रकारात त्या स्वत: निपुन आहेत या शिवाय बारामती येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात २००७-०८ साली महाराष्ट्र राज्य ज्यूदो ताक्वांदो संघटनेच्या सहकार्याने आयोजित “स्वयंसिद्धा” महीलां साठीचे स्वसंरक्षण प्रशिक्षण पुर्ण केले. या शिवाय राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत ही त्यांनी वेगळा ठसा उमटवला होता. आपल्या कडे असलेला हा अनमोल ठेवा आता संगिता अशोक ढगे पाथरी शहरातील मुलींना देतांना दिसून येतात. येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील मुलींना गेली गेली चार पाच वर्षा पासून त्या नियमित पणे स्वसंरक्षणा साठी कराटे चे प्रशिक्षण देत आहेत. या शिवाय स्व नितिन महाविद्यालय,वाघाळा येथील जि प शाळा अशा ठिकाणी मुलींना कराचे प्रशिक्षण देत आहेत. या शिवाय त्या स्वत:च्या राहात्या घरा जवळ सागर कॉलनीत स्वसंरक्षणा साठी कराटेचे खाजगी प्रशिक्षण क्लास घेतात या साठी नाममात्र दोनशे रुपये महीना भरासाठी आकारले जाते असे ही संगिता सांगतात. या शिवाय त्यांनी घेतलेली मेहनत ही स्वातंत्र्यदिन,प्रजासत्ताक दिन या दिवशी त्या पंचायत समिती प्रांगणात प्रात्यक्षिके दाखवत असतात.महीलांनी आता पुरुषांच्या बरोबरीची मानसीकता ठेवली पाहिजे.स्वत:चे रक्षण स्वत:केले पाहिजे असे त्या सांगतात. महीलांनी आता पुरूषी मानसीकतेचा सामना करण्या साठी स्वत:सिद्ध झालं पाहीजे तरच महीला अत्याचाराच्या घटना कमी होतील. प्रत्येक मुली ने या साठी सज्ज असलं पाहिजे असं ही संगिता सांगतात. स्वत:चे कुटूंब सांभाळत शालेय, महाविद्यालयीन मुलींना त्या नियमित पणे कराटे प्रशिक्षण देत आहेत. या शिवाय उत्कृष्ट अशा मेहंदी,रांगोळीचा काढण्याचा छंद ही त्या जोपासतात. याचे ही क्लास घेत त्या मुलींना रोजगाराची संधी ही उपलब्ध करून देत आहेत.अशा या आत्मनिर्भर असलेल्या संगिता आशोक ढगे यांना महीला दिना निमित्ताने त्यांच्या कार्यास मन पुर्वक शुभेच्छा.
परभणी प्रतिनिधी :-सय्यद अन्सारी