पुणे दि ३१ :- पुणे शहरात लॉकडाऊन असताना देखील घरे फोडणाऱ्या चोरट्यांनी त्यांची कामगिरी चोख पार पडली असून, पाषाण येथील एक दुकान व खराडी येथील एक घरे बंद फोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. पाषाण व खराडी येथे या घटना घडल्या आहेत.याप्रकरणी चंदननगर व चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पाषाण येथे येथील संजीत सहाणी वय ३६ वर्षे , रा . पाषाण , पुणे यांचे बंद असलेले इलेट्रीकलचे दुकान फोडले आहे व दुकानातून विक्रीसाठी असलेले दोन फॅन चोरून नेले आहेत.उन्हाळा सुरू झाल्यानंतर चोरट्यांनी फॅन चोरून नेल्याची चर्चा पाषाण परिसरात सुरू आहे. २९ मार्च रोजी रात्री २२ :०० वाजता नेहमी प्रमाणे त्यांचे दुकान बंद करून गेले होते. व दुसऱ्या दिवशी सकाळी ११:३० वाजता दुकान उघडल्यानंतर त्यांना दुकानातून विक्रीसाठी असलेले दोन फॅन चोरून नेल्याचे आढळून आले. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह. अधिक तपास चतुःश्रुंगी पो,उप,निरी,सरडे करत आहेत. तर दुसरी घटना पुणे खराडी परिसरातील प्रतिक राजेंद्र नहार (वय ३०) हे येथील अजमेरा टायर्सजवळ राहतात. दरम्यान त्यांच्या पत्नीचे २९ मार्च रोजी सकाळी १०:३० ते सांयकाळी १७:३०या दरम्यान ते स . नं . १३४ / २ / १ , पुणे नगर रोड , अजमेरा टायर्स जवळ , खराडी , पुणे येथे यातील फिर्यादी यांचा राहता फ्लॅट कुलुप लावुन बंद असतानाअज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप उटकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी फ्लॅटमधील एक लाख ९१ हजार रूपयांचे सोन्याचे दागिने व रोख एक लाख १८ हजार रूपये असा 3 लाख रुपयांचा ऐवज घरफोडी करून नेला.
फिर्यादी हे रात्री परतआले असता त्यांना फ्लॅटमध्ये घरफोडी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी चंदनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक , अण्णासाहेब टापरे करत आहेत.