पुणे दि ०६ : – पुणे मार्केटयार्डातील मुख्य बाजारात भाजीपाला, फळे आणि कांदा-बटाट्याची आवक हि ४१६ गाड्याची होत आहे. करोनामुळे बाजार समितीकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील कामकाज दिवसाआड सुरू ठेवण्यात येत आहे.भाजीपाला, फळे आणि कांदा-बटाटा विभागातील आवक दिवसाआड होत असून त्यामुळे बाजारआवारात होणारी गर्दी कमी होत आहे.खरेदीदार, आडते, हमाल, कामगार अशा बाजारघटकांमध्ये विशिष्ट अंतर राखण्यात येत
आहे.बाजारआवारात प्रवेशद्वारात निर्जंतुकीकरण यंत्रणा बसविण्यात आली आहे.सोमवारी मार्केटयार्डातील फळे तसेच कांदा-बटाटा विभागाचे काम सुरू राहिले. मार्केटयार्डातील मुख्य बाजारात कांदा-बटाट्याच्या १६६ गाड्यांची आवक झाली.एकुण मिळून ७ हजार ८०० क्विंटल कांदा-बटाट्याची आवक झाली.
२५० गाड्यांमधून फळांची आवक झाली.बाजारात एकुण मिळून ७ हजार ५०० क्विंटल आवक झाली. मोशीतील बाजारात १४१ गाड्या आवक झाली असून या बाजारात एकुण मिळून ३ हजार ५०० क्विंटल आवक झाली.दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खडकी आणि मांजरी येथील उपबाजारात खरेदीसाठी होणारी गर्दीमुळे बाजार समितीच्या प्रशासनाकडून या दोन्ही उपबाजारांचे कामकाज सोमवारी बंद ठेवले. करोनामुळे खरेदी-विक्री व्यवहारात ठराविक अंतर राखण्यासाठी तूर्तास दोन्ही बाजारांचे कामकाज बंद ठेवण्यात आले.या बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती बाजारसमितीकडून देण्यात आली आहे