पुणे दि ०७ :- कोरोना प्रादुर्भावाचे अनुशंगाने केंद्र शासनाने संपुर्ण देशात लॉकडाऊन जारी केला असुन पोलीस अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आसताना पुणे शहर वाहतूक शाखा पोलीसांनी एक हात मदतीचा हा उपक्रम दि ०६ रोजी सुसलिंक रोड. पाषाण निम्हण मळा. सोमेश्वरवाडी येथे वाहतूक शाखा
पोलीस अधिकारी व कर्मचारी व राजमुद्रा प्रतिष्ठान यांनी गोर गरीब रहिवाशांना जेवण वाटप केले आहे व पुणे शहर पोलीस कर्तव्या करत आसलेल्या पोलिसांनचे व राजमुद्रा प्रतिष्ठान यांचे रहिवाशांनी आभार व्यक्त केले आहे . सदरची कामगिरी वरिष्ठपोलीसनिरीक्षक, वाहतूक शाखा समुपदेशन विभाग पुणे शहर राजेश पुराणिक व सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली व राजमुद्रा प्रतिष्ठान, निलेश म निम्हण व ए.
एस. आय . संजय सोनवणे. फराहताई पठाण पोलीस. निलेश म निम्हण. राजाभाऊ निम्हण.काशिनाथ दळवी. योगेश शिंदे. बापु वामणे.राजू कसबे. गणेश वामणे. राहुल गुप्ता.सोमनाथ भोळे. रामदास सकट.संतोष क्षीरसागर उपस्थित होते व गोर गरीब रहिवाशांना जेवण वाटप करुन एक हात माणुसकीचा हे दाखवून दिले आहे पाषाण परिसरात नागरिकांमध्ये पुणे शहर पोलिस व राजमुद्रा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे हि चर्चा होत असल्याचे पाषाण परिसरात पाहण्यात मिळत आहे
टीप : गरजू लोकांनी मदतीसाठी राजमुद्रा प्रतिष्ठान. कार्यकर्त्यांशी संपर्कं साधावा मो.नं. 8421517676 / 9172312624 असे आव्हान निलेश म निम्हण यांनी केली आहे