पुणे दि ०८ :- पूर्ववैमनस्यातून चार जणांच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना लेन ११ , टिंगरेनगर विश्रांतवाडी , पुणे परिसरात घडली.आहे यातील तरुण गंभीर जखमी झाला आहे.या प्रकरणी प्रतीक माणतोडे वय – २४ याने तरुणांने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघीजनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकाच्या ओळखीचे आहेत. ददरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झोले होते. त्याचा राग आरोपींच्या मनात होता.मंगळवारी फिर्यादी हा टिंगरेनगर येथील लेन नंबर १ येथून पायी चालत जात होता.व त्यावेळी चौघांनी त्याला अडविले व काही दिवसापूर्वी जुन्या भांडणाचा राग मनात धरून , प्रतीक यांना लोखंडी रॉडने व विटांनी मारहाण करून तसेच लथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. तसेच तेथून पसार झाले. अधिक तपास विश्रांतवाडी सहा.पो . निरी.यादव तपास करत आहेत.