पुणे दि ०९ :-पुणे शहर पोलिसांना खोटी माहिती देवुन डिजिटल पास मिळविणाऱ्या ०६ व्यक्तींविरोधात गुन्हे शाखेकडुन कारवाई . पुणे पोलीसांनी पुणे शहरात मा . सह पोलीस आयक्त . सो . पुणे शहर यांचे आदेशान्वये सी . आर . पी . सी . कलम १४४ लागु असलेने संचारबंदी व जमावबंदी असुन लोकांना जीवनावश्यक वस्तुंचे वाहतुकीस व महत्वाचे कारणासाठी येणे – जाणेकरीता असुविधा होवु नये म्हणुन पोलीस आयुक्त , साो . पुणे शहर यांचे आदेशान्वये व मार्फतीने डिजीटल पासेस देण्यात येत आहेत . सदरसाठी पुणे पोलीसांमार्फत www . punepolice . in E / 2p QR code वर आधारीत लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे . त्यावर सेवा सेल चे पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण व त्याचा स्टाफ दिवस रात्र काम करीत आहे . सदर लिंकवर ज्या व्यक्तीस अतिमहत्वाचे कामासाठी घराबाहेर जाणे आहे , त्याबाबत तपशिल सदर लिंकवर भरायचा असतो , त्या व्यक्तीने दिलेला तपशिल हा खरा असल्याबाबत लेखी सुचना त्याच लिंकवर देण्यात आल्या आहेत , सदरची माहिती भरलेनंतर त्या व्यक्तीचे कारण संयुक्तिक असेल त्यांना त्याचे मोबाईल वरती टेक्ट मेसेज द्वारे त्यांना परवानगी दिली गेली आहे किंवा नाकरण्यात आली आहे हे कळविले जाते , जर परवानगी दिली गेली असेल तर टेस्क मेसेज मध्ये एक लिंक पाठविली जाते व त्या लिंक वर क्लिक करता एक क्यु . आर . कोड दिसतो तो सदर व्यक्तीने पोलीसांनी अडविल्यास दाखवणे अपेक्षित आहे . सदरबाबत व्हॉटसअॅप , टिवटर अशा माध्यमातुन तसेच प्रत्येक पोस्टेकडील मोबाईल व्हॅन द्वारे अनाऊसिंग करुन तसेच प्रत्येक नाकाबंदी पॉईंटला बोर्ड लावून जनजागृती करण्यात आली आहे . यासुविधेअंतर्गत दि . २८ ते दि ०९ / ०४ / २०२० या कालावधीत एकूण ३ लाख १८ हजार इतके विनंती अर्ज प्राप्त झाले असून त्या अर्जाची छाननी करण्यात येवून एकूण १ लाख ६३ हजार लोकांना परवानगी देण्यात आली आहे . त्यापैकी १ लाख ७ हजार विनंती अर्ज सुट देण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवा गटातील आहेत . तर ४७ हजार इतर लोकांना परवानगी देण्यात आलेली आहे . परवानगी देताना वैदयकीय कारणास्तव आलेल्या विनंती अर्जाचा प्राधान्य देण्यात आलेले असून त्यामध्ये कॅन्सर पेशंट १५६८ , आय . सी . यू पेशंट ११६४ , सर्जरी पेशंट १०४३ , डायलिसीस पेशंट ३४३ , डायबेटीक पेशंट ४१८ , प्रसुतीसाठी २६९१ व लहान मुलांवरील उपचाराकामी ६१९ अशा परवानग्या देण्यात आलेल्या आहेत . तसेच सदर माहिती भरण्याचे वेबपेजवर माहिती भरताना देण्यात आलेले अटी शर्ती मध्ये खोटी माहिती दिल्यास कायदेशिर कारवाई केली जाईल असे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत सांगण्यात आले आहे . सदर लिंकवर ९१७ लोकांनी आधारकार्ड बाबत खोटी माहिती भरुन परवानगीसाठी आवेदन केल्याचे निदर्शनास आले . त्या लोकांना सेवा सेल येथून एस . एम . एस पाठवून दुरुस्ती करण्याबाबत संधी देण्यात आली . त्या केसेसची छाननी करुन पोलीस उप आयुक्त साो गुन्हे बच्चन सिंग यांनी त्यातील संशयास्पद केसेस मधील माहितीची खात्री करुन त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सुचना महेंद्र जगताप , पोलीस निरीक्षक , युनिट २ , गुन्हे शाखा यांना दिल्या होत्या . त्याप्रमाणे पडताळणी करता ०६ इसमांनी पुणे पोलीसांचे डिजिटल पास मिळविण्यासाठी आधारकार्ड बाबत खोटी माहिती भरल्याचे निदर्शनास आलेने गुन्हे शाखा , युनिट – २ तर्फे आज ६ व्यक्तींविरोधात कारवाई करण्यात येवुन त्यांचेविरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे भा . द . वि . १७७ प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत . तरी पुणे शहरात राहणारे नागरीकांना आवाहन करण्यात येते की , कोरोना विषाणु प्रार्दुभावाचे अनुषंगाने खोटी माहिती देवुन पास मिळवु नये अन्यथा कायदेशिर कारवाई करण्यात येईल . सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त , गुन्हे श्री अशोक मोराळे , पोलीस उपायुक्त , गुन्हे बच्चन सिंग , यांचे मार्गदर्शनाखाली पोनि महेंद्र जगताप व युनिट २ कडील स्टाफने केली आहे .