नीरा नरसिंहपुर :दि.12 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार बावडा गावातील सोनार गल्ली येथील ग्रामस्थांनी काल (दि.11 एप्रिल) कोरोना व्हायरसमुळे संचारबंदीवर असलेले पोलिस कर्मचाऱ्यांचे घरासमोर गुढ्या उभारून स्वागत केले.यावेळी ग्रामस्थांनी दारात सुबक रांगोळ्याही काढलेल्या होत्या. पोलीस हे कुटुंबापासून दूर राहून जनतेचा कोरोनापासून बचाव व्हावा,याकरिता अहोरात्र
काम करीत आहेत. त्याबद्दल त्यांचा सन्मान व कौतुक करणेसाठी ग्रामस्थांनी गुढ्या उभारुन व अल्पआहार देऊन स्वागत केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित जाधव, पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.त्या सर्वांचे दिलीप दीक्षित, नंदकुमार शेटे व हनुमंत सरडे यांनी फेटा बांधून स्वागत केले.तर पद्मावती शेटे,वैशाली दिक्षित यांनी औक्षण केले.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांना धन्यवाद दिले.
नीरा नरसिंहपुर :- प्रतिनिधी बाळासाहेब सुतार