नांदेड दि २२ :- आज देशातील आलेल्या संकटांना सामना करताना सर्व सामान्य जनतेला खुपच हालअपेस्टटा होऊ नये म्हणून शासनाने अनेक योजना जाहीर केल्या त्यात ज्या दिव्यांग वृध्द निराधार याना उपासमार होउ नये म्हणून अनेक योजना जाहीर करण्यात आल्या ते पुढिल 1) दिव्यांग वृध्द निराधार याना उपासमार होऊ नये म्हणून दरमहा दोन हजार दरमहा तिन महिन्यासाठी जाहिर केले पण ते तर मिळतच नाही पण नेहमी मिळणारे दरमहा हजार रु तरी वेळेवर मिळावे म्हणून मी चंपतराव डाकोरे नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना व्हाटसअप्प वर निवेदन फोन करून प्रयत्न केल्यामुळे काहि तालुक्यातील तिन महिन्याचे अनुदान दिले तर काही तालुक्यात मिळालेच नाहि
2) दिव्याग बांधवाना शासनाने अन्नधान्याची किट एक महिना पुरेल एवढे जीवनावश्यक वस्तू देण्यात यावे असे जाहीर करून दिव्यांग आयुक्त पुणे यांनी दिनांक 26 मार्चला आदेश देऊन सुध्दा त्यांची अंमलबजावणी केली जात नसल्याने मी डाकोरे मा. मुख्यमंत्री, मा सामाजिक न्यायमंत्री, दिव्या आयुष्य पुणे, जिल्हाधिकारी ईत्यादी यांना आपले सरकार या पोरटलवर निवेदन व सर्व गटविकास अधिकारी यांना व्हाटसप्प, फोनवर विनंती केली कि आपल्या सर्व ग्रामसेवक यांना आदेश देऊन दिव्यांग निधी 5 टक्के निधी देण्यात यावा म्हणून मा उपमुख्यकार्यकारी पंचायत विभाग जिल्हा परिषद नांदेड यांनी 27 वेळा लेखी आदेश देऊन सुध्दा अशा संकटकाळी मदत व्हावी अशी विनंती केली तरी दिव्यांग हक्काचा निधी मिळाला नाहि.
3) दिव्याग बांधवांचा हक्काचा वैयक्तिक निधी पाच टक्के पंचायत समिती जिल्हा परिषद नांदेड नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांनी जर अशा संकटकाळी दिव्यांग निधी दिला तरी उपासमारी होनार नाहि म्हणुन डाकोरे पाटिल यांनी वेळोवेळी लेखणी चालऊन कुंभकर्ण प्रशासन जागे करण्यासाठी प्रयत्न करत असताना एकाही लोकप्रतिनिधी ने दखल घेतली जात नाही.
माञ जिल्हासमाजकल्याण जिल्हा प. नांदेड यांनी आपली माणुसकीचे दर्शन दाखविण्याचा प्रयत्न केला मा. समाजकल्याण अधिकारी आयुलवाड सरांनी आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दिव्यांग बांधवाना भाजीपाला आपल्या सर्व कर्मचारी स्वतःच्या पगारितून 2500 दिव्यांग बांधताना घरपोच भाजीपाला देऊन आपण कांही तरि संकटकाळी मदत करण्याचे धाडस दाखविले तसेच शासनाची मदत मिळेल तेव्हा मिळेल पण ज्या दिनदुबळ्या दिव्यांग, वृध्द निराधार यांना गावोगावी वरिल खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य व लोकप्रतिनिधी जसे निवडणूक वेळि मदत करण्यासाठी चुरस असते ते आता संकटकाळी मदत करावी असे आवाहन दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कूंचेलिकर यांनी केले