पुणे दि २१:- पुणे परिसरात ११० वर्षापूर्वी पुण्यातील प्लेगच्या साथित मरण पावणार्यांच्या अंत्यविधी करणारे साहित्य मिळावे यासाठी लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेने गणेश साने,हरी आपटे,व डॉ.मा.पू.जोशी यांच्या सहकार्याने स्थापन झालेल्या स्मशानफंड कमिटीच्या वतीने आज स्मशानातील कर्मचार्यांसाठी स्वामी बॅगनिर्मित लॅब टेस्टेड ७५ पी.पी.ई किटस प्रदान करण्यात आले.विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी ट्रस्टी बाळ साने,राजा फाटक,संजय गोखले,सुनील नेवरेकर,व जयंत साने,सतीश गणाचा-र्य,विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य विभाग प्रमुख आशिष महाडदळकर,राहुल जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोनाच्या या साथीत स्मशानभूमितील कर्मचा-यांना मृतदेह दहन करावे लागतात यांचे या किटने संरक्षण होईल असे ट्रस्टीनी या वेळी संगितले.या किटचा स्मशान कर्मचार्यांना उपयोग होईल असे आशिष महाडदळकर यांनी नमूद केले व आभार मानले.राहुल जगताप यांनी हे किट दर्जेदार असल्याचे संगितले.