• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 16, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुण्यातील एका बिल्डरला 2 कोटी रुपयाची खंडणी मागणारा पत्रकार व पोलीस पुणे शहर पोलिसांच्या जाळ्यात.

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
08/07/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ०७ : -पुणे शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाला खोट्या गुन्ह्यात  अडकवण्याची  धमकी देत रास्ता पेठेतील जागा आणि २ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी पुण्यातील पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेला कर्मचारी, व एक पत्रकार आणि शहरासह जिल्ह्यात आरटीआय कार्यकर्ते म्हणून असणाऱ्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, इतरांचा शोध सुरु आहे. दरम्यान याप्रकरणानंतर शहरात प्रचंड खळबळ माजली आहे. याप्रकरणी अमोल सतीश चव्हाण, आरटीआय कार्यकर्ते रवींद्र बराटे, शैलेश जगताप, पत्रकार देवेंद्र जैन आणि एका महिलेवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सुधीर कर्नाटकी (वय 64) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. दरम्यान त्यांची आणि यातील आरोपी महिलेची ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यावेळी ओळखीतून त्यांनी महिलेला बावधन परिसरात एक फ्लॅट भाडे तत्त्वावर घेऊन दिला. त्यानंतर हा फ्लॅट दोघांच्या नावावर केला. मात्र यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. तिने फिर्यादी यांना कोणत्याही गुन्ह्यात अडकवू शकते असे म्हणत पैश्यांची मागणी सुरू केली. तसेच तिच्या पाठीमागे रवींद्र बराटे, शैलेश जगताप, पत्रकार देवेंद्र जैन अश्या व्यक्ती असल्याचे सांगत धमकावत होती. त्यानंतर तिने 6 लाख रुपये मागत बावधन येथील फ्लॅट नावावर करण्याचा तगादा लावला. तसेच बराटे हा मोठा माणूस असून, त्याचे मोठ्या राजकीय व्यक्तींशी संबंध आहेत. तर शैलेश जगताप याचे पोलीस दलात ओळखी आहेत. तसेच जैन हा पत्रकार असून, तो बातमी देऊन सर्वत्र बदनामी करेल असे सांगत धमकावले. तर फ्लॅट व पैसे देण्याचे लिहून घेतले. त्यांनी स्टॅम्प पेपरवर करारनामा करून घेतला. त्यानंतर फिर्यादी खरेदीसाठी बाहेर गेले असता आरोपी महिला व चव्हाण या दोघांनी त्यांना अडविले. तसेच फ्लॅट व 6 लाख यासोबतच 2 कोटी रूपये देण्याची मागणी सुरू केली. तसेच 2 कोटी व रास्ता पेठेतील जागा द्यावी लागेल यासाठी तुम्ही पुढचे बोलणे देवेंद्र जैन आणि शैलेश जगताप यांच्याशी बोला असे देखील सांगत त्यांना धमकावले. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
यानंतर पत्रकार जैन याने फिर्यादी यांना फोनकरून त्यांना भेटायला बोलावले. त्यावेळी फिर्यादी हे जैन यांच्या व फिर्यादी याच्या कॉमन मित्रा मार्फत जैन यांना भेटण्यास गेले. त्यावेळी जैन यांनी पैसे तसेच रास्ता पेठेतील जागा द्या. अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल होईल. बातमी दिल्यानंतर बदनामी होईल. तर यात शैलेश जगताप, बराटे आणि चव्हाण अशी लोक आहेत. हे काय तुम्हाला सोडणार नाहीत. तुमचा मुडदा पडतील असे सांगत त्यांना धमकावले. त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांना रस्त्यावरून जात असताना महिलेचे प्रकरण मिटवा अन्यथा महागात पडेल अशी धमकी दिली होती. त्याने हेल्मेट घेतले असल्याने फिर्यादी यांना ते ओळखू आले नाही. त्याबाबत त्यांनी त्यावेळी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.मात्र फिर्यादी हे आरोपींच्या धमक्यांना घाबरले नाही. त्यांनी पैसे आणि फ्लॅट नावावर करून न देता रास्ता पेठेतील जागा देखील दिली नाही.याचा बदला म्हणून फिर्यादी यांच्यावर यातील आरोपी महिलेने इतर आरोपींच्या मदतीने कटरचून हिंजवडी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर फिर्यादी यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान या गुन्ह्यानंतर पोलीस दलासोबतच सामाजिक, राजकिय आणि व्यापारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच पोलिसांनी पत्रकार देवेंद्र जैन, पोलीस दलातून बडतर्फ केलेला शैलेश जगताप आणि महिला आरोपी यांना ताब्यात घेतले आहे. तर आरटीआय कार्यकर्ते बराटे व सतीश चव्हाण यांचा शोध घेतला जात असल्याचे पोलीस अधिकाऱ्यानी सांगितले.याप्रकरणात शैलेश जगताप, देवेंद्र जैन आणि आरोपी महिला अश्या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर इतरांचा शोध घेतला जात असून, पुढील तपास सुरू आहे.व फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनंतर कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बालवडकर करीत आहेत.

Previous Post

पोलिस शिपाई भरतीच्या निर्णयानं शहरी व ग्रामीण तरुणांना नोकरीची संधी राज्यात पोलिस शिपाई संवर्गातील 10 हजार जागा भरणार, नागपूरच्या काटोल इथं एसआरपीएफची महिला बटालियन– उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Next Post

कंत्राटी वीज कामगारांचे आजपासून काम बंद आंदोलन सुरु…..पुण्यातील महावितरण कार्यालयाबाहेर करण्यात आले आंदोलन

Next Post

कंत्राटी वीज कामगारांचे आजपासून काम बंद आंदोलन सुरु.....पुण्यातील महावितरण कार्यालयाबाहेर करण्यात आले आंदोलन

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist