पुणे ग्रामीण दि २०: – इंदापूर हद्दीतील निमगाव केतकी येथे एका शेतात पत्र्याचे शेडमध्ये बनावट दारू तयार करून त्यावर नामांकीत कंपण्याचे लेबल लावुन बनावट दारू बनवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती व इंदापूर पोलीसांनी कारवाई केली आहे व दोन जणांवर गुन्हा दाखल केला असुन ३६ हजार ८२० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.व व पोलिसांची चाहूल लागतात आरोपी फरार झाले आहे. विजय आनंद घाडगे.रा.गलांडवाडी नं.१, ता.इंदापूर, जि.पूणे व आसीफ रमजान तांबोळी रा.इंदापूर, जि.पूणे अशी बनावट दारू बनविणार्या आरोपींची नावे असुन पो.काँ. दत्तात्रय रामचंद्र अर्जुन, इंदापूर पोलीस स्टेशन यांनी याबाबतची फिर्याद इंदापूर पोलीसात दिली असुन फिर्यादीत म्हटले आहे की मौजे निमगाव केतकी गावचे हद्दीत रामकुंड येथील सदाशिव गोविंद काळे यांचे शेतात पत्र्याचे शेड भाड्याने घेवुन त्यामध्ये दोन आरोपी हे बनावट दारू तयार करून त्यावर खोटे देशी दारू, टँगो पंच नावाचे खोटे लेबल लावुन व बनावट दारू तयार करून विक्री करून फसवणुक करत असल्याची गुप्त माहीती इंदापूर पोलीसांना मीळाली होती.सहाय्यक पोलीस निरिक्षक बीरापा लातुरे यांनी पोलीस पथकासह सदर ठिकाणी छापा टाकला असता दारूच्या बाटल्यांच्या टोपनांना शिल करण्याचे ३५ हजार रूपये किमतीचे एक मशीन, व देशी दारू,टँगो पंच नावाचे लेबल असलेल्या ३५ बाटल्या, मोकळ्या काचेच्या २० बाटल्या, टँगो लिहीलेले १८० टोपण, देशी दारू टँगो पंच नावाचे १५० स्टीकर, एक निळ्या रंगाचे कँड, फेव्ही काॅलच्या चार बाटल्या असा १८२० मुद्दे मालासह एकुण ३६ हजार ८२० रूपयाचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे दोन जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक बीरापा लातुरे हे करत आहेत..