• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 16, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

दगडूशेठ’ च्या श्रीं समोर अथर्वशीर्ष पठणाची परंपरा कायम

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
23/08/2020
in ठळक बातम्या, सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; *मुख्य मंदिरात प्रत्यक्षपणे पाच महिलांची तर ऑनलाइन पद्धतीने हजारो भाविकांची उपस्थिती ; उपक्रमाचे ३४ वे वर्ष*

पुणे दि २३ :- ओम नमस्ते गणपतये… चे स्वर ऋषीपंचमीच्या निमित्ताने दगडूशेठ गणपतीसमोर यंदा देखील निनादले. एरवी हजारो महिलांच्या उपस्थितीत होणारा सोहळा यंदा दगडूशेठच्या मुख्य मंदिरात अवघ्या ५ महिलांच्या उपस्थितीत पार पडला. तर, हजारो भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या या सोहळ्यात सहभाग घेतला.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षी ऋषिपंचमीनिमित्त अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शितल तानवडे, सीमा लिमये, विद्या अंबर्डेकर, हेमलता डाबी, सुप्रिया सराफ या ५ महिलांनी मुख्य मंदिरातून प्रत्यक्षपणे सहभाग घेतला. या पाच महिला सलग १० वर्षे या उपक्रमात सहभाग घेत आहेत. यंदा उपक्रमाचे ३४ वे वर्ष आहे.अथर्वशीर्ष पठणाचा प्रारंभ सकाळी ६ वाजता शंख वादनाने झाला. ओमकार, गीत, गजर यांसह मंदिरात उपस्थित महिलांनी श्री गणराया चरणी अथर्वशीर्ष सादर केले. तसेच गणेशाची आरती देखील करण्यात आली.उत्सवकाळात मंदिरात केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होणार आहेत. मंदिरा बाहेरून दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांकडून हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नसून प्रसाद दिला जाणार नाही. त्यामुळे भक्तांनी उत्सकाळात गर्दी करु नये व आॅनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.   श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth _ Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे.
प्रेसनोट प्रसिद्धीसाठी-
*’दगडूशेठ’ च्या श्रीं समोर अथर्वशीर्ष पठणाची परंपरा कायम* 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; *मुख्य मंदिरात प्रत्यक्षपणे पाच महिलांची तर ऑनलाइन पद्धतीने हजारो भाविकांची उपस्थिती ; उपक्रमाचे ३४ वे वर्ष*

पुणे : ओम नमस्ते गणपतये… चे स्वर ऋषीपंचमीच्या निमित्ताने दगडूशेठ गणपतीसमोर यंदा देखील निनादले. एरवी हजारो महिलांच्या उपस्थितीत होणारा सोहळा यंदा दगडूशेठच्या मुख्य मंदिरात अवघ्या ५ महिलांच्या उपस्थितीत पार पडला. तर, हजारो भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या या सोहळ्यात सहभाग घेतला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षी ऋषिपंचमीनिमित्त अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शितल तानवडे, सीमा लिमये, विद्या अंबर्डेकर, हेमलता डाबी, सुप्रिया सराफ या ५ महिलांनी मुख्य मंदिरातून प्रत्यक्षपणे सहभाग घेतला. या पाच महिला सलग १० वर्षे या उपक्रमात सहभाग घेत आहेत. यंदा उपक्रमाचे ३४ वे वर्ष आहे.

अथर्वशीर्ष पठणाचा प्रारंभ सकाळी ६ वाजता शंख वादनाने झाला. ओमकार, गीत, गजर यांसह मंदिरात उपस्थित महिलांनी श्री गणराया चरणी अथर्वशीर्ष सादर केले. तसेच गणेशाची आरती देखील करण्यात आली.

उत्सवकाळात मंदिरात केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होणार आहेत. मंदिरा बाहेरून दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांकडून हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नसून प्रसाद दिला जाणार नाही. त्यामुळे भक्तांनी उत्सकाळात गर्दी करु नये व आॅनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth _ Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे.

Previous Post

पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली इंदापूर, बारामती आणि पुरंदर तालुक्यातील कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी

Next Post

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळापासून “स्वच्छतेचा जागर” सुरु…

Next Post

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळापासून “स्वच्छतेचा जागर” सुरु...

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist