पुणे दि ११ : -भारतीय जनता पार्टी प्रणित शिववाहतुक संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी निलेश मधुकर निम्हण यांची निवड करण्यात आली आहे.भारतीय जनता पार्टी प्रणित शिववाहतुक संघटना हाजी अरफात शेख (राष्ट्रीय अध्यक्ष) यांच्या हस्ते नियुक्त प्रमाणपत्र देऊन निलेश मधुकर निम्हण यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवडी करण्यात आली कार्यालयात झालेल्या बैठकीत या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर तनवीरभाई जोड ( राष्ट्रीय सरचिटणीस) अजर शेख (महाराष्ट्र उपाध्यक्ष) काका मस्के (पुणे जिल्हा,अध्यक्ष) यशवंत दादा देवकर (शहर अध्यक्ष) आदी मान्यवर उपस्थित होते व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कोरोना संकटात संघटनाचे सर्व कार्यकर्त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. व संघटना बांधणीवर भर द्यायचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या पदाला साजेसे असे काम करावे. सर्व आघाड्यांच्या बैठका नियमित व्हाव्यात आदी ठराव या बैठकीत पारित करण्यात आले.