दिल्ली दि १६ : – वृत्तसंस्था – दिल्लीतील मयूर विहार परिसरातील एका व्यक्तीला त्याच्याच बायकोने बेदम मारहाण केल्याचे घटना घडली आहे. बायकोने जास्त पैसे खर्च केल्याने त्याने तिला हटकले आणि घरखर्चासाठी आणखी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या बायकोने नवऱ्याला वायपरने बेदम मारहाण केली. संतापलेल्या बायकोच्या तावडीतून त्याने आपली कशीबशी सुटका करुन घेतली.दरम्यान या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. नवऱ्याला जखमी अवस्थेत लालबहादूर शास्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. पतीने पोलिसांना दिलेल्या जबाबानंतर बायको विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चौकशी करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत त्रिलोकपुरीत राहते. त्याचा स्वत:चा व्यवसाय आहे. लॉकडाऊननंतर व्यवसाय मंदावला. घरखर्च भागवताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे बायको व नवऱ्या मध्ये खटके उडू लागले.सोमवारी नवऱ्या बाहेरुन घरी आला. त्यावेळी बायकोने त्याच्याकडे घरखर्चासाठी पैसे मागितले. नवऱ्याने पैसे नाहीत आणि मित्राकडून उसने पैसे घेणार असल्याचे सांगितल्याने तिला राग आहे. नवऱ्याला घराबाहेर जात असतानाच तिने दरवाजात त्याला रोखले. घरातील वायपरने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत तो जखमी झाला. शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. तसेच त्यांनी जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन नवऱ्याचा जबाब घेऊन बायको विरोधात गुन्हा दाखल केला.