पुणे दि २८ :- पुणे खेड शिवापूर परिसरातून घरी परत येत असताना एका डॉक्टर दाम्पत्याला दोघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून लुटल्याचा घटना रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास मुंबई-बेंगलोर हायवेवर साताराकडून पुण्याच्या दिशेला कात्रज नवीन बोगद्यापासुन ५०० मीटरच्या अंतरावर घडला.आहे
या प्रकरणी चिन्मय देशमुख ( वय ३२, रा. बिबवेवाडी, पुणे ) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिस उपनिरीक्षक महेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देशमुख व त्यांच्यापत्नी असे दोघेही डॉक्टर आहेत. ते त्यांच्या पत्नीसह कारमधून कात्रज नवीन बोगद्यापासुन पुण्याच्या दिशेला जात असताना फिर्यादी हे लघुशंकेसाठी थांबले होते. यावेळी दुचाकीवरून आलेले दोन अज्ञात चोरट्यांनी देशमुख यांच्या पत्नीच्या पोटाला बंदुक लावली व त्यांच्याकडे पैशाची मागणी केली.चोरट्यांनी फिर्यादी देशमुख व त्यांची पत्नी यांच्या जवळील दोन सोन्याच्या अंगठ्या व मनगटी घडयाळ असा एकुण १ लाख २० हजार किंमतीचा ऐवज जबरदस्तीने हिसकावुन चोरून नेला.