पुणे ग्रामीण दि २८ :-पुणे जिल्ह्यात लग्न समारंभासह इतर कोणत्याही कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त पाहुण्य किंवा मित्रमंडळीं यांना सहभागी होण्यास आमंत्रण देऊ नये. अन्यथा कडक कारवाईचा इशारा पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिला आहे. ५० पाहुण्यांमध्ये लग्न आणि इतर समारंभ करीत असताना सोशल डिस्टन्स आणि मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे, त्याचा प्रभावी वापर न झाल्यास संबंधितावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.तुळशीचे लग्न झाल्यानंतर लग्न समारंभासह इतर कार्यक्रम सुरू झाले आहेत. मात्र, नागरिकांकडून कोरोना नियमावलीचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आदेशानुसार पुणे ग्रामीण पोलिसांकडून कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील वाढत्या कोरोनामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त बाळगून खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्याशिवाय नियमभंग करणाऱ्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. अनेकांकडून कोरोनाची खबरदारी घेतली जात नसल्यानेच संसर्ग वाढला आहे. त्यामुळे आता गावोगावी लग्न आणि इतर समारंभात ५० पेक्षा जास्त पाहुण्यांना किंवा मित्रमंडळींना आमंत्रित करणाऱ्याना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. पुणे ग्रामीण पोलिसांचे आवाहन लग्न समारंभ करीत असताना ५० पेक्षा जास्त पाहुण्य किंवा मित्रमंडळीं नको
लग्न समारंभात सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर, मास्क वापरणे बंधनकारक आहे मंगल कार्यालय व्यवस्थापकाने संबंधित लग्नात येणाऱ्या नागरिकांची यादी बाळगणे आवश्यक
बेकायदेशीर गर्दी, जमाव होऊ न देणे कोरोना नियमावलीचे झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे
सोशल डिस्टन्स बाळगून कार्यक्रम संपन्न करणे संबंधीतांची जबाबदारी आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालय व्यवस्थापकासह इतरांनाही जबाबदार धरण्यात येईल. नागरिकांनी स्वयंशिस्त बाळगून पोलिसांना सहकार्य करावे. असे आव्हान पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, – डॉ. अभिनव देशमुख, यांनी केले आहे