पुणे, दि. १६ डिसेंबर: ‘मिस्टर अँड मिस पुणे एलिट’ स्पर्धेच्या दुस-या पर्वाचे विजेत्यांचा किताब अभिषेक माने आणि श्रृती ब्रह्मभट्ट यांना मिळाला आहे. चिराग वैद्य आणि लावण्या पति प्रथम उपविजेते झाले तर विपुल पाटील आणि श्रुती येवले या द्वितीय उपविजेते झाले. स्टारस्ट्रीम एंटरटेंनमेंटच्या वतीने आयोजित केलेल्या या सौंदर्य स्पर्धेमध्ये १०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेला ज्यूरी म्हणून फेमिना मिसेस स्टालिस्टा स्वाती सराफ, मिस महाराष्ट्र एलिट रिया मेहिंदिरत्ता, प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. जावेद खान, फिटनेस मॉडेल आणि अभिनेते गौरव सिपानी यांनी स्पर्धेचे ज्यूरी म्हणून काम पाहिले. यावेळी प्रिया राणा, कॉस्मोग्लिट्जच्या डिजायनर ममता मंगलाणी, लॅक्मे अॅकाडमी खराडी आणि नक्षत्र द रॉयल वेडींग तसेच प्रणल ऑर्गनाझेनचे प्रतिनिधी, सेलेब्रिटी फोटोग्राफर अर्णब घोष, शिवानी नागरे, उपस्थित होते.
स्टारस्ट्रीम एंटरटेंनमेंटच्या डायरेक्टर सोहेल सय्यद म्हणाले की, तरुण आणि तरुणींना सक्षम बनविणे आणि सकारात्मक स्व-प्रतिमा विकसित करण्याची संधी देणे हे आमच्या कंपनीचे लक्ष आहे. आम्ही तरुण पिढीला त्यांची कौशल्ये आणि वकृत्व क्षमता जोपासण्याची संधी उपलब्ध करुन देत आहोत. या स्पर्धेद्वारे आयुष्यभर आठवणी निर्माण करणार्या संधींची पूर्तता आणि अनुभव देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यात मदत करतो. पुण्यात दुस-यांदा मिस्टर अँड मिस एलिट स्पर्धा आयोजित होत आहे. प्रश्नोत्तरांची फेरी, परिचय फेरी, रॅम्प वॉक आणि टॅलेंट राऊंड अशा विविध प्रक्रियेतून विजेत्यांची निवड केली गेली. विजेत्यांना रोख पारितोषिक, पोर्टफोलिओ शूट, ब्रँड शूट, मॉडेलिंग असाईनमेंट, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र मिळाले.