पिंपरी, दि.१९ :– महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सारख्या विविध उपक्रमांचा आधार घेऊन कोरोना काळात शैक्षणिक कार्यक्रम महापालिकेच्या शिक्षकांनी असाच पुढे चालू ठेवावा. या माध्यमातून कोरोना विषयक नियमांचे पालन करत विद्यार्थी देखील शिक्षणात अग्रेसर राहतील असा विश्वास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केला.
महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व शाळांमधील कोवीड काळातील केलेल्या उपक्रमांच्या “शाळा लॉक तरीही शिक्षण अनलॉक” या पुस्तकरूपी प्रकाशनाचा कार्यक्रम महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत मधुकरराव पवळे सभागृहात पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेता राजू मिसाळ, आयुक्त श्रावण हर्डीकर, शिक्षण समिती सभापती मनिषा पवार, जैव विविधता व व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा उषा मुंढे, मनसे गटनेते सचिन चिखले, ड प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर, नगरसदस्य तुषार कामठे, नगरसदस्या प्रियंका बारसे, शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी जोत्स्ना शिंदे, पराग मुंढे, माहिती व जनसंपर्क विभागाचे मुख्य लिपिक प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
उपमहापौर केशव घोळवे म्हणाले कोरोना सारख्या महामारीमुळे संपूर्ण जगावर मोठे संकट कोसळले आहे या परिस्थितीमध्ये शिक्षण विभागाने विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नये याकरीता हा अभिनव पध्दतीने स्तुत्य उपक्रम राबविला आहे. असे सांगून कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिक्षण विभागाने घेतलेल्या परिश्रमाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
तर कोरोना काळात आपण अडचणींवर मात करीत महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पध्दतीचा वापर करून शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवित आहोत. विविध उपक्रमांचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड न पडू देता निरंतर शिक्षणासाठी महापालिका सतत प्रयत्नशील आहे असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
कोरोना काळात महानगरपालिका शाळेतील शिक्षकांनी पीसीएमसी ऑनलाईन विकास मंच, शिक्षक मित्र उपक्रम, ऑनलाईन अँप्स व व्हिडीओद्वारे वर्ग चालविणे, ऑनलाईन परीक्षा इत्यादी उपक्रमाद्वारे शाळा सुरू ठेवण्यासाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नांबद्दल महापौर माई ढोरे यांच्या हस्ते मोहसीन अब्दुला, सखाराम डहाळे, महमद, जुनेद शाबाद, संदीप वाघमारे, दयानंद यादव, वनिता नेहे, जबीन सय्य्द या शिक्षकांचा भेटपुस्तक देऊन सन्मान करण्यात आला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जोत्स्ना शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे मुख्य लिपिक प्रफुल्ल पुराणिक यांनी केले