पिंपरी चिंचवड दि ०४ :- पि.चि.सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी आज सोमवारी दि.४ दुपारी १.४५ वाजता सुमारास इंदोरी टोलनाक्या जवळील सोनू ढाव्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या येलवाडी या ठिकाणी काही इसम हे एच पी कंपनीच्या १५ टन कॅप्सूलमधुन गॅस टाकीमध्ये धोकादायकरित्या गॅस भरुन एलपीजी गॅस काढुन गॅसची चोरी करुन काळ्या बाजारात विक्री करतात अशा गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीवरुन सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी वरिष्ठांच्या सुचना व मार्गशनाखाली त्या ठिकाणी सापळा रचुन पथकाने येलवाडी परिसरात सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.व टोलनाक्याजवळील येलवाडी या ठिकाणी कारवाई करण्यात आली. या प्रकरणी रुपेश रामदुलार गौड (वय 25, रा. चेंबुर, मुंबई), मुख्य वितरक दिनेशकुमार लेखरात विष्णोई (वय 30, रा. येलवाडी, देहू, मुळगाव जोधपूर , राजस्थान) तसेच त्यांचे इतर 15 साथीदार यांच्या विरुध्द म्हाळुंगे पोलीस चौकीत गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एचपी कंपनीच्या 15 टन कॅप्सूलमध्ये गॅसची चोरी करुन त्याची काळ्या बाजारात विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली.पोलिसांना मिळाली त्यानुसार पथकाने येलवाडी परिसरात सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून ६० लाख ९६ हजार किंमतीचा भरलेला कॅप्सूल गॅस टँकर, २५ लाख ८५ हजार किंमतीचा एक टेम्पो, महिंद्रा पिकअप, दोन बोलेरो पिकअप, चार ॲपे, दोन छोटा हत्ती व वॅगनार अशी एकूण १० वाहने तसेच, तीन लाख १५ हजार किंमतीच्या १८४ रिकाम्या गॅस टाक्या, १ लाख १६ हजार ३० रोख रक्कम, १ लाख ८८ हजार ७०० रूपयांचे १८ मोबाईल, १२ हजार १३५ रूपयांचे इलेक्ट्रीक वजन काटे व पाईप कनेक्टर असा एकूण ६५ लाख ६८ हजार ३६५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व तसेच गॅस सिलेंडर मधून घरगुती गॅसची चोरी करुन काळ्या बाजारात विक्री करणाऱ्यांवर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिस पथकाने मोठी कारवाई केली आहे. दोन ठिकाणी केलेल्या या कारवाईत तब्बल ७७ लाख ४० हजार ७७१ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, १९ आरोपींना अटक केली आहे.सामाजिक सुरक्षा विभागाची पहिली कारवाई चिंबळी, ता.खेड याठिकाणी दि.०३ रोजी १६:५० वा . चे सुमारास ज्ञानेश्वर महाराज व मोतीराम महाराज गॅस सर्व्हिसिंग स्टील होम रिपेरिंग सेंटर स्वयंभू भारत गॅस नावाचे दुकानामध्ये करण्यात आली. याप्रकरणी दुकान मालक विलास भगवान खोडे (शिंदे) (वय 42, रा. चिंबळी गावठाण, ता.खेड), टेम्पो चालक सतिश मनोहर परबत (वय 35, रा. चिंबळी चौक, ता. खेड), स्वयंभू गॅस एजन्सीचे मालक रविंद्र सातकर (रा. ता. खेड) यांच्या विरूद्ध आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी घरगुती गॅसची चोरी करुन तो सिलेंडरमध्ये भरुन साठवणुक करून विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने आळंदी परिसरात सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.त्यांच्याकडून ७ हजार रुपये रोख रक्कम, सात लाख १० हजार किंमतीचा चारचाकी टेम्पो, ४ लाख ५५ हजार २२६ रूपयांच्या गॅसच्या १५३ रिकाम्या टाक्या, १२६ गॅसने भरलेल्या टाक्या असा एकूण ११ लाख ७२ हजार ३६६ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सपोनि निलेश वाघमारे, सपोनि डॉ.अशोक डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके, विजय कांबळे, नितीन लोंढे, संदिप गवारी, संतोष असवले, भगवंता मुठे, महेश बारकुले, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, योगेश तिडके, राजेश कोकाटे, वैष्णवी गावडे, संगिता जाधव, सोनाली माने, योगीनी कचरे, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रशांत सोरटे, सचिन नागरे, होमगार्ड मयुर ढोरे यांनी केली.