पुणे दि ०८ : – पुण्यातील गुटखा कनेक्शन पुणे शहर पोलिसांनी शोधून काढत सर्वात मोठी कारवाई काल केली असून,पुणे शहरातून चंदननगर ते गुजरात गुटखा कारवाई करत तबल 15 कोटी रुपयांचा गुटखा पुणे शहर पोलिसांनी पकडला आहे. त्यामूळे गुजरात सह राज्यात व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. व दोन आरोपींना अटक केली आहे पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे व उपायुक्त बच्चन सिंह, व युनिट 4 चे पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल उपस्थित होते.
पुणे पोलिसांनी 17 डिसेंम्बर रोजी चंदननगर परिसरात छापे मारी करत सुरेश अग्रवाल, अक्षय सुरेश अग्रवाल, आकाश सुरेश अग्रवाल, नीरज मुकेश सिंगल, प्रवीण मुकुंद वाहुळ यांच्यावर छापमारी करत साडे सात लाख रुपयांचा गुटखा जप्त केला होता.याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचा तपास गुन्हे शाखेचे युनिट चारचे पथक करत होते.
आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल आणि त्यांच्या पथकाची कारवाई सुरू असताना गुटख्यात हवाला मार्फत पैसे देवाण घेवाण होत असल्याची माहिती समोर आली. यानंतर पोलिसांनी छापे टाकत फरासखाना व विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली होती. यावेळी 9 जणांना पकडण्यात आले होते. तर 4 कोटींच्या जवळपास रोकड पकडली होती. एकाच वेळी वेगवेगळ्या 5 ठिकाणी छापे टाकले होते. यानंतर हडपसर आणि वानवडी येथे देखील छापे टाकत चौघांना अटक केली. त्यात 25 लाख रुपयांचा गुटखा पकडला होता. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर गुटखा कनेक्शन हे गुजरातमधील वापी व सिल्वासा येथे असल्याचे समजले होते.
त्यानुसार सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, उपनिरीक्षक जयदीप पाटील, कर्मचारी राजेश शेख, सचिन ढवळे, कौस्तुभ जाधव, शीतल शिंदे यांच्या पथकाने या दोन ठिकाणी छापे मारी करत तबल 15 कोटी रुपयांचा ‘गोवा’ गुटखा आणि इतर गुटखा पकडला आहे. कारवाईत मात्र पोलिसांना आरोपी सापडले नाहीत. ते फरार झाले असून, त्यांची नावे निष्पन्न झाले आहेत, असे पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.व
राज्य गुजरात व सिल्व्हासा ( दादरा व नगर हवेली ) येथे अवैधरित्या प्रतिबंधीत गुटखा तयार करुन त्याचा मोठया प्रमाणावर पुरवठा चोरटया मार्गाने करुन अटक आरोपींच्या मार्फतीने वितरण करतात हे निष्पन्न झाले . त्या अनुशंगाने दिनांक ०६/०१/२०२१ रोजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता , सह पोलीस आयुक्त , रविंद्र शिसवे, अतिरिक्त पोलीस आयुक्त ( गुन्हे ) अशोक मोराळे , पोलीस उप आयुक्त, गुन्हे बच्चनसिंह , सहा पोलीस आयुक्त . गुन्हे -२ बोराटे , यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ४ गुन्हे शाखा पुणे शहर येथील पोलीस उप निरीक्षक जयदिप पाटील , पोलीस अंमलदार राजस शेख , सचिन ढवळे , कौस्तुभ जाधव , शितल
शिंदे यांचे पथक तपासकामी वापी राज्य गुजरात व सिल्हासा ( दादरा व नगर हवेली ) पाठविण्यात आले . सदर पथकाने गोपनीय बातमीदारामार्फत सिल्हासा स्थित गोया या नावाने प्रतिबधीत गुटखा उत्पादन करान पुरवठा करणाऱ्या काशी हेयर्स या कंपनीचा शोध लावला . त्यानंतर पोलीस पथकाने सिल्व्हासा येथील स्थानिक पोलीस अन्न व औषध प्रशासन यांचे मदतीने सदर कंपनीचर छापा टाकून एकुण १५ कोटी एवढ्या मोठ्या रकमेचा प्रतिबंधीत गोवा गुटखा बनविण्यासाठी उपयोगात येणारा कच्चा माल त्यामध्ये सेंट ( सुंगधी द्रव्य ) , तंबाखु , सुपारी , चुना , कात पावडर , कॅल्शियम कार्यानेट पावडर , मेन्थॉल क्रिस्टल , इलायची , ग्लिसरीन . इ . पदार्थ व यंत्रसामुग्री जप्त केली . सदर प्रतिबंधीत गौवा गुटखा उप्तादन करणाऱ्या फॅक्टरीचे मालक , चालक तसेच प्रतिबधीत गुटखा उत्पादन करण्यासाठी लागणारे साहित्य त्यामध्ये सेंट ( सुंगधी द्रव्य ) , तंबाणु , सुपारी , चुना , कात पावडर , कॅल्शियम कार्बोनेट पावडर , मेन्थॉल क्रिस्टल , इलायची , ग्लिसरीन , इ . साहित्य पुरवठा करणाऱ्याची नावे निष्पन्न असून , ते सध्या फरार आहेत , पोलीस आयुक्त .पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली सिल्व्हासा ( दादरा व नगर हवेली ) स्थित गोवा या नावाने प्रतिबंधीत गुटखा उत्पादन करुन पुरवठा करणाऱ्या काशी व्हेंचर्स या कंपनीवर टाकलेला छापा व जप्ती ही भारतातील सदर अवैध उदयोगावरील आजपावेतोचा सर्वात मोठा छापा आहे .