पुणे दि १६ : – इंधन दर वाढीच्या विरोधात आज पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात आले . काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सातारा रोडवर इंधन दर वाढी विरोधात आंदोलन केले . यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली . तसेच दुचाकी ढकलत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सदकारचा निषेध केला . यु.पी.ए. सरकारच्या काळात आरराष्ट्रीय बाजारामध्ये इंधनाचे दर खुप जास्त असताना देखिल यु.पी.ए. सरकारने सर्वसामान्य लोकांना इंधन योग्य दरात विक्री केले . मात्र एन.डी.ए.
सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर खुप कमी असताना देखिल एन.डी.ए. सरकार खुप जास्त दर आकारून लोकांना इंधन विक्री करत आहे . ही एकप्रकारे सर्वसामान्य जनतेची लूट आहे . सन २०१४ ला यु.पी.ए. ची सत्ता असताना केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी या इंधन दरवाढी विरोधात सारखे रस्त्यावर उतरून आंदोलन करायच्या , मात्र आता स्मृती ईराणी कुठे गेल्या . त्यांना आता झालेली इंधन दर वाढ दिसत नाही का ? असा सवाल यावेळी अभय छाजेड यांनी उपस्थित केला . यावेळी प्रदेश काँग्रेसचे चिटणीस संजय बालगुडे , पुणे मनपा चे काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल तसेच माजी महापौर कमलताई व्यवहारे , महिला काँग्रेसच्याअध्यक्षा सोनाली मारणे , युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल मलके , पी.एम.टी. चे माजी चेअरमन मा . सुधीर काळे , माजी नगरसेवक बंडु नलावडे , लोकाध्यक्ष रमेश सोनकांबळे अदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते .