श्रीगोंदा दि १९ :- प्रतिनिधी श्रीगोंदा बसस्थानक येथे बसमधील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या पर्समधील दागिने, रोख रक्कम चोरणाऱ्या दोन महिलांना श्रीगोंदा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली असुन,त्यांच्याकडून २ लाख ५० हजार रुपये किमतीचे ४२ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. ज्योती मधुकर रोकडे वय 30 वर्षे, आशाबाई मधुकर रोकडे वय 55 वर्षे,दोघी रा.स्टेशनरोड राहुरी,ता.राहुरी जि.अहमदनगर यांना अटक केली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की,दि.४/१/२०२१ रोजी दुपारी ३:४० वाजेच्या सुमारास श्रीगोंदा बस स्टँण्डवर श्रीगोंदा ते जामखेड बसमध्ये चढत असताना सविता दादासाहेब क्षीरसागर यांचे अज्ञात चोरट्याने पर्समधील पाकीटात ठेवलेले सोन्याचे दागिने गर्दीचा फायदा घेऊन पर्समधील आतल्या कप्प्याची चैन उघडून त्यातील एक सोन्याचे गंठन सुमारे अडीच तोळे वजनाचे,कानातील सोन्याचे टॉप्स, जोड अर्धा तोळे वजनाचे, कानातील सोन्याचे वेल जोड अर्धा तोळे वजनाचे,दोन सोन्याच्या अंगठ्या सात ग्रॅम वजनाचे असे एकूण ४२ ग्रॅम वजनाचे सोने चोरून नेले होते.याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे कर्मचारी दि.१९/०२/२०२१ रोजी श्रीगोंदा बसस्थानकात गस्त घालत असताना त्यांना महिलांच्या पर्समधील दागिने चोरणाऱ्या महिला श्रीगोंदा बसस्टॉपवर असल्याची माहिती मिळाली़. त्यानुसार त्यांनी दोन महिला ज्योती मधुकर रोकडे वय 30 वर्षे, आशाबाई मधुकर रोकडे वय 55 वर्षे,दोघी रा.स्टेशनरोड राहुरी,ता.राहुरी जि.अहमदनगर यांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले आहे़. त्यांच्याकडून २लाख ५०हजार असे एकूण ४२ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.ही कामगिरी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि.दिलीप तेजनकर,पो.हे.कॉ.अंकुश ढवळे,पो.कॉ प्रकाश मांडगे,पो.कॉ दादा टाके,पो.कॉ किरण बोराडे पो.कॉ संजय काळे,पो.कॉ गोकुळ इंगवले,पो.कॉ योगेश सुपेकर,म.पो.कॉ लता पुराणे,म.पो.को गितांजली लाड यांनी केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे